ऋजुता लुकतुके
यंदाची टी-२० विश्वचषक स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये संयुक्तपणे होणार आहे. आणि स्पर्धेतील सगळ्यात लक्षवेधी लढत असणार आहे ती पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यानची न्यूयॉर्कला होणारी लढत. हा सामना लाँग आयलंडमध्ये नसॉ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअमवर होणार आहे. हे स्टेडिअम अजून बांधून पूर्ण झालेलं नाही. पण, आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जुलैला होणाऱ्या भारत – पाक सामन्यासाठी लोकांनी आतापासून तिकीटांची मागणी सुरू केली आहे. आणि खासकरून या सामन्यासाठी क्षमतेपेक्षा २०० पट लोकांनी तिकीट खरेदी करण्याची इच्छा दाखवलीय. (Ind vs Pak T20 World Cup Tie)
या स्टेडिअमची क्षमता ३४,००० प्रेक्षकांची आहे. आणि आयोजकांना आताच सामना हाऊस फुल्ल होणार याची खात्री वाटतेय. अमेरिकेच्या तुलनेत वेस्ट इंडिजमधील सामन्यांना कदाचित जास्त गर्दी होईल. पण, अमेरिकेतही आयोजकांना भारत आणि पाकिस्तानी वंशाच्या लोकांकडून चांगल्या तिकीट विक्रीची अपेक्षा आहे. (Ind vs Pak T20 World Cup Tie)
(हेही वाचा – CM Eknath Shinde : सर्वांचे घराचे स्वप्न पूर्ण करणार)
अमेरिकेत पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा होत आहे. दक्षिण फ्लोरिडा, डॅलस, सॅनफ्रान्सिस्को आणि न्यूयॉर्क या ४ ठिकाणी मिळून अमेरिकेत एकूण १६ सामने होणार आहेत. खासकरून भारत आणि पाकिस्तानचे सगळे साखळी सामने अमेरिकेतच होतील. आयोजकांना या स्पर्धेपासून खूप अपेक्षा आहेत. अमेरिकेत क्रिकेटपेक्षा बेसबॉल हा खेळ लोकप्रिय आहे. (Ind vs Pak T20 World Cup Tie)
‘अमेरिकेतील निर्वासित लोकांमध्ये क्रिकेट आधीच लोकप्रिय आहे. अशा लोकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळावं. आणि जे मूळ अमेरिकन लोक आहेत, त्यांच्यामध्ये या खेळाविषयी थोडंतरी कुतुहल जागृत व्हावं, अशी उद्दिष्टं आम्ही ठेवली आहेत. २०२८ च्या ऑलिम्पिकमध्ये टी-२० क्रिकेटचा समावेश आहे. त्या मोठ्या सोहळ्यापूर्वी देशात क्रिकेटची ही सुरुवात आहे,’ असं टी-२० विश्वचषक स्पर्धेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रेट जोन्स एएफसी वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले. (Ind vs Pak T20 World Cup Tie)
टी-२० विश्वचषकाची सुरुवात १ जूनला अमेरिका विरुद्ध कॅनडा या सामन्याने होणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community