दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या महिला टी-20 वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात भारताने विजयी सुरुवात करत पाकिस्तानला 7 गड्यांनी पराभूत केले. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 150 धावांचे लक्ष्य दिले. उत्तरात भारताने 19 षटकांत 3 गडी गमावत 151 धावा केल्या. जेमिमा राॅड्रिग्ज आणि रिचा घोष या जोडीने भारताला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
जेमिमा राॅड्रिग्जने (53) नाबाद अर्धशतक झळकावले. (भारताने दुस-या सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग केला. इंग्लंडने 2009 मध्ये 164 धावांचा पाठलाग केला होता. ( भारतीय संघ ब गटात दुस-या क्रमांकावर असून इंग्लंडचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे.
पाकिस्तानकडून नशरा संधू हिने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. पाकिस्तानच्या कर्णधाराची 68 धावांची खेळी व्यर्थ ठरली. जेमिमा राॅड्रिग्ज हिला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. पाकिस्तानने दिलेले 150 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शेफाली वर्मा आणि यस्तिका भाटिया यांनी आक्रमक सुरुवात करुन दिली. पण 38 धावांवर यस्तिका भाटिया हिच्या रुपाने भारताचा पहिला विकेट गेला.
( हेही वाचा: मुंबईतील प्रस्तावित २५ हवा शुद्धीकरण यंत्रांचा गाशा गुंडाळला )
वादळी खेळीमुळे भारताचा दणदणीत विजय
यस्तिका हिने 17 धावांची खेळी केली. त्यानंतर जेमिमा आणि शेफाली वर्मा यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण संधूने शेफलीला बाद करत भारताचा दुसरा विकेट केला. शेफाली वर्मा 33 धावांवर बाद झाली. त्यानंतर जेमिमा हिने कर्णधार हरमनप्रीत कौरसोबत भागिदारी करत विजयाकडे आगेकूच केली होती. त्यानंतर भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर 16 धावा काढून तंबूत परतली. परंतु जेमिमा आणि ऋचा घोष यांनी संयमी आणि तितकीच आक्रमक फलंदाजी केली. अखेरच्या चार षटकात 41 धावांची गरज होती. त्यावेळी दोघींनी वादळी खेळी करत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
Join Our WhatsApp Community