Ind vs SA 1st ODI : रोहित आणि विराटच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची विश्वचषकानंतर नवीन सुरुवात

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानचा पहिला एकदिवसीय सामना रविवारी जोहानसबर्ग इथं होणार आहे. 

201
Ind vs SA 1st ODI : रोहित आणि विराटच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची विश्वचषकानंतर नवीन सुरुवात
Ind vs SA 1st ODI : रोहित आणि विराटच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची विश्वचषकानंतर नवीन सुरुवात
  • ऋजुता लुकतुके

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानचा पहिला एकदिवसीय सामना रविवारी जोहानसबर्ग इथं होणार आहे. (Ind vs SA 1st ODI)

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान एकदिवसीय मालिका रविवारपासून सुरू होत असली तरी सगळ्याचं लक्ष २६ तारखेला होणाऱ्या पहिल्या कसोटीकडेच आहे आणि आताच्या एकदिवसीय मालिकेकडे कसोटी संघाची पायाभरणी म्हणूनच पायाभरणी जात आहे. (Ind vs SA 1st ODI)

कारण, स्पष्ट आहे. विश्वचषक स्पर्धेदरम्यान भारताने एकदिवसीय क्रिकेटमधील आपलं वर्चस्व क्रिकेट जगताला दाखवून दिलं आहे. आता वेळ कसोटीची आहे. विश्वचषक गाजवणारे रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शामी आता संघात नाहीएत. त्यामुळे युवा संघाची कसोटी लागणार आहे ती दिग्गजांची उणीव संघाला भासू न देण्यात. (Ind vs SA 1st ODI)

ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंग, संजू सॅमसन यांना ती संधी आहे. तशीच ती अर्शदीप सिंग, मुकेश कुमार आणि अवेश खान यांनाही आहे. दिग्गज खेळाडूंची जागा काही महिन्यांत खाली होणार आहे. त्यासाठी दावेदारी सांगण्याची ही संधी आहे. शिवाय दक्षिण आफ्रिकेची खेळपट्टी नेहमीच खडतर असते. तिथे स्वत:ला सिद्ध करता आलं तर ती फलंदाजांची जमेची बाजू असणार आहे. (Ind vs SA 1st ODI)

(हेही वाचा – Jaguar F-Type R-Dynamic Black : जॅग्वारची ही डायनॅमिक स्पोर्ट्स कार आता भारतात, किंमत ठाऊक आहे का?)

एक-दोन वर्षांत रोहितला बदली नेतृत्व शोधावं लागणार

म्हणूनच ही मालिकाही भारतीय खेळाडूंची कसोटी म्हणून ओळखली जाईल. माजी कसोटीपटू संजय मांजरेकरने तर स्पष्टच म्हटलंय की, या एकदिवसीय मालिकेकडे खेळाडूंनी कसोटी संघात स्थान मिळवण्याच्या दृष्टीने पाहावं. दुसरं म्हणजे ही कसोटी कर्णधार के एल राहुलची आहे. फलंदाज म्हणून आणि यष्टीरक्षणात त्याने आपलं स्थान दाखवून दिलंय. महत्त्वाचे निर्णय घेताना कप्तान रोहितही अनेकदा त्याचा सल्ला घेताना दिसला. (Ind vs SA 1st ODI)

आता त्याला स्वतंत्रपणे स्वत:चे नेतृत्व गुण सिद्ध करायचे आहेत. कारण, रोहित अजून किती दिवस खेळेल माहीत नाही. पण, आणखी एक-दोन वर्षांत रोहितला बदली नेतृत्व शोधावं लागणार आहे. तेव्हा हार्दिकला कडवी टक्कर देण्याची ही संधी के एल राहुलला साधता येईल. (Ind vs SA 1st ODI)

(हेही वाचा – India vs South Africa: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिका १७ डिसेंबरपासून सुरू, वेळापत्रक जाणून घ्या…)

यजुवेंद्र चहल आणि अक्षर पटेल सांभाळणार फिरकीची बाजू

एकदिवसीय संघात फिरकीची बाजू यजुवेंद्र चहल आणि अक्षर पटेल सांभाळणार आहेत. दोघांची एकदिवसीय विश्वचषक खेळण्याची संधी हुकली होती. पण, आता शेवटच्या टी-२० सामन्यात खेळपट्टीने फिरकीला साथ दिली. तसंच झालं तर दोघांनाही खेळवण्याचा निर्णय संघ प्रशासन घेऊ शकतं आणि तेव्हा स्वत:ला सिद्ध करण्याची जबाबदारी दोघांची असेल. (Ind vs SA 1st ODI)

दक्षिण आफ्रिकेचा संघ मायदेशी खेळत असल्यामुळे तसा बिनधास्त असेल. पण, त्यांनाही विश्वचषकानंतर नवीन सुरुवात करायची आहे. क्विंटन डी कॉक, बवुमा आणि रबाडा, एनगिडी या संघात नाहीएत. आशादायी असला तरी कोत्झीएची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अजून सुरुवात आहे. जानसेनलाही आपला जम बसवायचा आहे. त्या मानाने ब्रिट्झ, मार्करम, क्लासेन आणि मिलर यांच्यामुळे फलंदाजी तशी मजबूत दिसत आहे. (Ind vs SA 1st ODI)

दोन तुल्यबळ संघांमधील ही लढत बघायला मजा येणार आहे. (Ind vs SA 1st ODI)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.