दक्षिण आफ्रिका (IND vs SA 1st ODI) संघाने भारताला केवळ ११७ धावांचे आव्हान दिले होते. भारताच्या यंग ब्रिगेडने धमाकेदार सुरुवात केली. भारतीय फलंदाजांनी हे आव्हान केवळ १६.४ षटकांमध्ये पूर्ण केले.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (IND vs SA 1st ODI) पहिल्या एकदिवसीय सामन्यात के. एल. राहुलच्या नेतृत्वात आवेश खान आणि अर्शदीप सिंगच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने आठ गडी राखून विजय मिळवला.
(हेही वाचा – Hardik Pandya: मुंबई इंडियन्सने केवळ एका तासात गमावले ४ लाख फॉलोअर्स, काय आहे कारण? वाचा सविस्तर…)
असा रंगला सामना
आवेश खानने त्याच्या आठ षटकांत २७ बाद ४ धावा केल्या, तर डावखुरा अर्शदीपने १० षटकांत ३७ बाद ५ धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ २७.३ षटकांत ११६ धावांवर बाद झाला. त्यानंतर साई सुदर्शन (नाबाद ५५) आणि श्रेयस अय्यर (५२) यांनी अर्धशतकी खेळी करत १६.४ षटकांत दोन गडी गमावून लक्ष्य गाठले. (IND vs SA 1st ODI)
Scalping a 5⃣-wicket haul, Arshdeep Singh was on a roll with the ball & bagged the Player of the Match award as #TeamIndia won the first #SAvIND ODI. 👏 👏
Scorecard ▶️ https://t.co/tHxu0nUwwH pic.twitter.com/tkmDbXOVtg
— BCCI (@BCCI) December 17, 2023
या मॅचमधून २२ वर्षीय टॉप ऑर्डर फलंदाज बी. साई सुदर्शन आणि गोलंदाजी अष्टपैलू नंदरे बर्गर यांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झाले.
प्रथम फलंदाजी करताना, दक्षिण आफ्रिकेने आपला वेग गमावला, विकेट्स गमावत राहिले. भारताच्या अर्शदीप सिंगने पाच बळी घेतले तर आवेश खानने चार बळी घेतले. कुलदीप यादवने त्याच्या ट्रेडमार्क शैलीने दक्षिण आफ्रिकेचा (IND vs SA 1st ODI) डाव संपवला. दक्षिण आफ्रिकेने २७.३ षटकांत केवळ ११६ धावा केल्या.
A comfortable chase for India as Sai Sudharsan scores an unbeaten fifty on ODI debut 👏#SAvIND | 📝: https://t.co/41fhHQfcmC pic.twitter.com/i2AQxFbHMf
— ICC (@ICC) December 17, 2023
(हेही वाचा – Sachin Tendulkar चा मुंबई इंडियन्सला राम राम? चर्चेला उधाण)
दक्षिण आफ्रिका विरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका बरोबरीत संपवल्यानंतर, युवा भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेची विजयी सुरुवात केली आहे. एकदिवसीय मालिकेत के. एल. राहुल, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल यासारख्या काही महत्त्वाच्या खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे. (IND vs SA 1st ODI)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community