Ind vs SA 1st ODI : ‘स्वप्न पूर्ण होतात,’ साई सुदर्शनची पदार्पणानंतरची पहिली प्रतिक्रिया

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात साई सुदर्शनने अर्धशतक करत पदार्पण साजरं केलं. 

190
Ind vs SA 1st ODI : ‘स्वप्न पूर्ण होतात,’ साई सुदर्शनची पदार्पणानंतरची पहिली प्रतिक्रिया
Ind vs SA 1st ODI : ‘स्वप्न पूर्ण होतात,’ साई सुदर्शनची पदार्पणानंतरची पहिली प्रतिक्रिया
  • ऋजुता लुकतुके

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात साई सुदर्शनने (Sai Sudharsan) अर्धशतक करत पदार्पण साजरं केलं. (Ind vs SA 1st ODI)

युवा भारतीय फलंदाज साई सुदर्शनने (Sai Sudharsan) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपलं एकदिवसीय पदार्पण अर्धशतक झळकावत दणक्यात साजरं केलं. भारतीय संघाने (Indian Team) या मालिकेत आता १-० अशी आघाडीही घेतली आहे. आणि यात ११७ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना साई सुदर्शनने ४३ चेंडूंत शानदार ५५ धावा केल्या. त्याच्या जोरावर भारताने आठ गडी राखून विजयही मिळवला. (Ind vs SA 1st ODI)

(हेही वाचा – NIA Raid : अमरावतीतील विद्यार्थ्याचे ISIS कनेक्शन;एनआयएने छापा टाकून केली अटक)

भावनांना करुन दिली मोकळी वाट 

पदार्पणातील या कामगिरीनंतर सुदर्शनने (Sai Sudharsan) सोशल मीडियावर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ‘लहानपणापासून इतरांसारखंच एक स्वप्न मी ही पाहिलं होतं, देशासाठी खेळण्याचं. आणि थोडी मेहनत केली, जिगर दाखवली, तर स्वप्न पूर्ण होतात हे आज कळलं,’ असं सुदर्शनने लिहिलं आहे. (Ind vs SA 1st ODI)

सुदर्शन (Sai Sudharsan) सलामीला येताना अजिबात गोंधळून गेला नाही. त्याच्या ५५ धावांमध्ये ९ चौकारांचा समावेश आहे. ऋतुराज गायकवाड (Rituraj Gaikwad) झटपट बाद झाल्यावर त्याने श्रेयस अय्यरबरोबर महत्त्वपूर्ण भागिदारीही केली. कर्णधार के एल राहुलकडून भारतीय संघाची कॅप मिळणं आणि श्रेयसबरोबर भागिदारीचा अनुभव यातून चांगल्या आठवणी तयार झाल्याचं सुदर्शनने म्हटलं आहे. (Ind vs SA 1st ODI)

(हेही वाचा – NIA Raid : अमरावतीतील विद्यार्थ्याचे ISIS कनेक्शन;एनआयएने छापा टाकून केली अटक)

एकदिवसीय मालिकेत शुभमन गिलला विश्रांती

सुदर्शन प्रथमश्रेणी क्रिकेटमधील भारतातील जानंमानं नाव आहे. १२ सामन्यांमध्ये ४२ त्या सरासरीने त्याने ८४३ धावा केल्या आहेत. तर ए श्रेणीच्या सामन्यांतही ६३ च्या सरासरीने १,३५४ धावा केल्या आहेत. देशांतर्गत टी-२० सामन्यांतही त्याने ३७ च्या सरासरीने ९७६ धावा केल्या आहेत. (Ind vs SA 1st ODI)

जोहानसबर्गच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने आधी दक्षिण आफ्रिकेला ११६ धावांत रोखलं. यात अर्शदीपचे ५ तर आवेश खानने ४ गडी बाद केले. त्यानंतर या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रेयस आणि सुदर्शन यांनी दुसऱ्या गड्यासाठी ८८ धावांची भागिदारी रचत भारताचा विजय सुकर केला. एकदिवसीय मालिकेत भारताने शुभमन गिलला विश्रांती दिली आहे. तर रोहीत शर्माही खेळत नाहीए. त्यामुळे सुदर्शनला सलामीला संधी मिळाली आहे. (Ind vs SA 1st ODI)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.