Ind vs SA, 1st T20 : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिली टी२० भारताने ६१ धावांनी जिंकली 

Ind vs SA, 1st T20 : संजू सॅमसनने टी-२० प्रकारात आपलं सलग दुसरं शतक ठोकलं 

94
Ind vs SA, 1st T20 : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिली टी२० भारताने ६१ धावांनी जिंकली 
Ind vs SA, 1st T20 : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिली टी२० भारताने ६१ धावांनी जिंकली 
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघाची दक्षिण आफ्रिकेतील सुरुवात मोठ्या विजयाने झाली आहे. सामन्यावर संपूर्ण वर्चस्व गाजवत भारतीय संघाने आफ्रिकेचा ६१ धावांनी पराभव केला. फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी भारताला दिली. पण, संजू सॅमसनने त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवला. कारण, पहिल्या चेंडूंपासून त्याने फटकेबाजी सुरू केली. सहाव्या षटकांतच भारताचं अर्धशतक फलकावर लावलं. (Ind vs SA, 1st T20)

(हेही वाचा- Assembly Election : महाराष्ट्र आणि झारखंड निवडणुकीच्या निकालांवर प्रभाव पाडण्याचा माओवादी संघटनेचा कट?)

५० चेंडूंत १०७ धावा करताना संजूने तब्बल १० षटकार ठोकले. भारताला दोनशेचा टप्पा आरामात गाठून दिला. तो मैदानावर होता तेव्हा भारत अडिचशेच्या पार जाणार असंच वाटत होतं. पण, शेवटच्या ४ षटकांत भारताने ठरावीक अंतराने फलंदाज गमावले. त्यामुळे भारताची धावगती काहीशी मंदावली. अखेर निर्धारित २० षटकांत भारताने ८ बाद २०२ धावा केल्या. सॅमसनच्या पाठोपाठ तिलक वर्माने ३३ आणि सूर्यकुमार यादवने २१ धावा केल्या. (Ind vs SA, 1st T20)

फलंदाजीत जे वर्चस्व भारताच्या आघाडीच्या फळीने गाजवलं ते आफ्रिकन फलंदाजांना मात्र जमलं नाही. वरुण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोईच्या फिरकीच्या जाळ्यात ते अडकले. (Ind vs SA, 1st T20)

Insert tweet – https://x.com/BCCI/status/1854958277278548376

Insert tweet – https://x.com/BCCI/status/1854930276972970403

संजू सॅमसनने आंतरारष्ट्रीय टी-२० मधील आपलं सलग दुसरं शतक झळकावलं. ते ही ४७ चेंडूंमध्ये यातील नंतरच्या ५० धावा त्याने २० चेंडूंत पूर्ण केल्या. एकाही आफ्रिकन गोलंदाजाला त्याने सोडलं नाही. याउलट आफ्रिकन फलंदाज बिश्नोईचे गुगली चेंडू ओळखू शकले नाहीत. तर वरुण चक्रवर्तीनेही त्यांना चेंडूची गती बदलत पेचात पकडलं. (Ind vs SA, 1st T20)

(हेही वाचा- Assembly Election : ‘सक्षम ॲप’ ठरणार दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी वरदान)

धोकादायक वाटणाऱ्या रायन रिकलटन (२१) आणि हेनरिक क्लासेन (२५) यांना वरुणने शिताफीने बाद केलं. त्यानंतर घणाघाती फलंदाजी करणाऱ्या डेव्हिड मिलरचा काटाही त्यानेच काढला. हे तीन महत्त्वाचे बळी त्याने मिळवले. भारताला विजयाच्या समीप आणलं. (Ind vs SA, 1st T20)

भारतीय संघाने आता या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. पुढील सामना येत्या रविवारी गबेखा इथं होणार आहे. (Ind vs SA, 1st T20)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.