IND vs SA 1st test : गडगडलेल्या टीम इंडियाला केएल राहुलने सावरले; दिवसअखेर भारताच्या २०८ धावा

211

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात मंगळवार, २६ डिसेंबर रोजी पहिल्या कसोटी सामन्याचा (IND vs SA 1st test) पहिला दिवस होता. त्यामध्ये भारताचा संघ अक्षरशः गडगडला रोहित शर्मा आणि शुभमन गिल ही पहिली जोडी झटपट बाद झाली. त्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर हे दोघेही चांगली सुरुवात करूनही फार कला टिकू शकले नाही. अखेर केएल राहुलने संघाचा दावा सावरला. राहुलच्या अर्धशतकीच्या खेळीने भारताचा डाव दिवस अखेर ८ बाद २०८ धावा होता.

रोहित शर्मा ५ धावा काढून बाद

पहिल्या दिवशी पावसामुळे ५९ षटकांनंतर खेळ थांबवण्यात आला. कगिसो रबाडाने पाच बळी टिपले. भारताकडून केएल राहुलने एकट्याने खिंड लढवत, नाबाद ७० धावा केल्या. वरची फळी आणि मधली फळी अपयशी ठरली. प्रथम फलंदाजी करताना भारताचा कर्णधार रोहित शर्मा ५ धावा काढून बाद झाला. यशस्वी जैस्वालने थोडीशी आक्रमक सुरूवात केली होती, पण तो देखील १७ धावांवर बाद झाला. त्याने ४ चौकार खेचले. युवा शुबमन गिल २ धावांवर धावचीत झाला. त्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर जोडीने संयमी खेळी केली. त्यांनी ६८ धावांची भागीदारी केली. पण संघाची शंभरी गाठण्याआधीच अय्यर ३१ धावा काढून माघारी परतला. त्याने ३ चौकार आणि २ षटकार मारले. विराट कोहलीने एक बाजू लावून धरत फलंदाजीचा प्रयत्न केला होता, पण त्यालाही मोठी खेळी करता आली नाही. विराट ५ चौकारांसह ३८ धावा काढून माघारी परतला. केएल राहुलने मात्र भारतीय संघाची लाज राखली. त्याने एका बाजूने शांत व संयमी खेळी सुरू ठेवली. रविचंद्रन अश्विन (८) आणि जसप्रीत बुमराह (१) झटपट बाद झाले. शार्दुल ठाकूरने धावसंख्येला थोडा हातभार लावला. त्याने ३ चौकारांसह २४ धावा केल्या.

(हेही वाचा Prakash Ambedkar :  प्रकाश आंबेडकरांची लोकसभेच्या १२ जागांची मागणी; आघाडीत बिघाडीची शक्यता… )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.