ऋजुता लुकतुके
जोहानसबर्गमध्ये भारताने जिंकलेली बाजी (Ind vs SA 2nd ODI) दक्षिण आफ्रिकेनं गेबेखामध्ये भारतावरच उलटवली. आणि दुसरा एकदिवसीय सामना ८ गडी राखून जिंकत आफ्रिकन संघाने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. आधी गोलंदाजी आणि मग फलंदाजीतही त्यांनी वर्चस्व गाजवलं. इथं झालेल्या टी-२० सामन्याची आठवण ठेवून दक्षिण आफ्रिकेनं सामन्यात नाणेफेक जिंकून भारताला पहिली फलंदाजी दिली. आणि हा निर्णय नांद्रे बर्गर, बायरन हेनरिक्स आणि केशव महाराज यांनी सार्थ ठरवला.
भारतीय फलंदाजांनाही छोट्या मैदानावर फटकेबाजीचा मोह आवरता आला नाही. आणि परिणामी भारतीय डावांत भागिदारी होऊ शकली नाही. ठरावीक अंतराने फलंदाज बाद होत गेले. आणि धावफलकावर ४६ षटकांत २११ धावा लागल्या असताना संघ सर्वबाद झालाही.
That’s that from the 2nd ODI.
South Africa win by 8 wickets.
The three match series now stands at 1-1 with one more game to go.#SAvIND pic.twitter.com/OyMlrBKrCr
— BCCI (@BCCI) December 19, 2023
कर्णधार के एल राहुलने ५६ तर साई सुदर्शनने ६२ धावा केल्या. त्यानंतर तिसरी मोठी धावसंख्या होती ती रिंकू सिंगची १७ धावांची. २११ धावांचं माफक आव्हान मग आफ्रिकन फलंदाजांनी लिलया परतावून लावलं.
गोलंदाजीतही अर्शदीप, मुकेश कुमार, आवेश खान, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव हे गोलंदाज छाप पाडू शकले नाहीत. रझा हेनरिक्स आणि टोनी डी झोरजी यांनी १३० धावांची सलामी आफ्रिकन संघाला करुन दिली. आणि हेनरिक्स ५२ धावांवर बाद झाल्यावर टोनी डी झोरजीने आगेकूच सुरूच ठेवली.
१२२ चेंडूंत ११९ धावा करताना त्याने ६ षटकार आणि ९ चौकार लगावले. खासकरून कुलदीपच्या फिरकीचा त्याने चांगला समाचार घेतला. एकदिवसीय क्रिकेटमधील (Ind vs SA 2nd ODI) ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आहे. त्यालाच सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
दोन्ही संघांदरम्यान आता तिसरा आणि मालिकेतील शेवटचा एकदिवसीय सामना २१ तारखेला पर्ल इथं होणार आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community