Ind vs SA 2nd T20 : भारत वि. द. आफ्रिका दुसऱ्या टी-२० सामन्यावरही पावसाचं सावट

दक्षिण आफ्रिकेत पावसाळी वातावरण असल्यामुळे दुसरा टी-२० सामना तरी होईल का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. युवा खेळाडूंना विश्वचषक स्पर्धेआधी आपलं कसब दाखवण्याची संधी हवी आहे. 

1967
Ind vs SA 2nd T20 : भारत वि द आफ्रिका दुसऱ्या टी-२० सामन्यावरही पावसाचं सावट
Ind vs SA 2nd T20 : भारत वि द आफ्रिका दुसऱ्या टी-२० सामन्यावरही पावसाचं सावट
  • ऋजुता लुकतुके

दक्षिण आफ्रिकेत पावसाळी वातावरण असल्यामुळे दुसरा टी-२० सामना तरी होईल का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. युवा खेळाडूंना विश्वचषक स्पर्धेआधी आपलं कसब दाखवण्याची संधी हवी आहे. (Ind vs SA 2nd T20)

भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत दरबन इथं पोहोचल्यापासून संघाचा दोन दिवसांचा सराव ढगाळ वातावरणात पण, कुठल्याही व्यत्ययाशिवाय पार पडला. नंतरचे तीन दिवस मात्र तिथे पाऊस पडतोय. त्यामुळे पहिला टी-२० सामनाही अगदी नाणेफेकही न होता वाहून गेला. आता दुसऱ्या सामन्यावरही तेच सावट आहे. त्यामुळे भारतीय युवा खेळाडू ज्यांना टी-२० विश्वचषकापूर्वी कसब दाखवण्याची एक संधी हवी आहे, त्यांची सध्या घालमेल सुरू आहे. (Ind vs SA 2nd T20)

(हेही वाचा – Virat Kohli : दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेत विराट कोहली निर्णायक भूमिका बजावेल, कॅलिसला विश्वास)

निवड समितीने ‘इतक्या’ जणांचा संघ पाठवला दक्षिण आफ्रिकेत

जूनमध्ये होणाऱ्या विश्वचषकापूर्वी भारतीय संघ फक्त सहा टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. यातला एक आधीच वाहून गेलाय. आता दक्षिण आफ्रिकेबरोबरचे उर्वरित दोन आणि अफगाणिस्तानबरोबरचे तीन सामने फक्त बाकी आहेत. आताच्या मालिकेत निवड समितीने तब्बल १७ जणांचा संघ दक्षिण आफ्रिकेत पाठवला आहे. पण, यातल्या किती जणांना खेळण्याची संधी मिळणार हे काही सांगता येत नाही. त्यामुळेच फक्त खेळाडूच नाही तर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनाही चिंता वाटतेय. (Ind vs SA 2nd T20)

त्यामुळे दुसरा टी-२० सामना झाला तरी त्यात कुठल्या खेळाडूंना संधी द्यायची हाच द्रविड यांच्यापुढे प्रश्न असेल. म्हणजे सुर्यकुमार, श्रेयस आणि शुभमन या विश्वचषकातील स्थान जवळ जवळ निश्चित असलेल्या खेळाडूंना सरावाची संधी द्यायची की, यशस्वी, रिंकू सिंग, ईशान किशन, जितेश शर्मा यांच्यासारख्या संघाचे दरवाजे ठोठावणाऱ्यांना आजमावायचं आणि अशा खेळाडूंचा समन्वय कसा साधायचा हा द्रविड यांच्यासमोरचा मोठा प्रश्न असेल. (Ind vs SA 2nd T20)

(हेही वाचा – Pak Team Without Doctor : पाकिस्तान क्रिकेट संघाबरोबर डॉक्टरच नाहीत)

आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी हवी ‘या’ खेळाडूंना 

गोलंदाजांसाठी तर आव्हान आणखी मोठं आहे. कारण, भारताच्या टी-२० संघात गोलंदाजांच्या जागा अजून भरलेल्या नाहीत. अर्शदीप, मुकेश कुमार, अवेश खान या सगळ्यांना संधी आहे. तर अक्षर पटेल आणि रवी बिश्नोई यांनाही फिरकीपटू म्हणून संधी आहे. पण, त्यापूर्वी आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी या खेळाडूंना हवी आहे आणि ती दक्षिण आफ्रिकेत यातल्या किती जणांना मिळते हे आता पावसावर आणि द्रविड यांच्या रणनीतीवर अवलंबून असेल. (Ind vs SA 2nd T20)

आफ्रिकेत संधी हुकली तर आयपीएल हा युवा खेळाडूंकडे सगळ्यात मोठी संधी असेल आपलं कसब निवड समितीला दाखवायची आणि निवड समितीलाही आयपीएलचा निकष धरुनच संघाची निवड करावी लागेल. खासकरून विराट आणि रोहीत टी-२० विश्वचषकासाठी उपलब्ध झाले तर निवड समिती आणि द्रविड अशा दोघांचं काम बिकट होणार आहे. (Ind vs SA 2nd T20)

(हेही वाचा – Virat Kohli : दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेत विराट कोहली निर्णायक भूमिका बजावेल, कॅलिसला विश्वास)

आफ्रिकन संघाची ‘ही’ आहेत आशास्थानं

त्यामुळे मंगळवारी दुसऱ्या टी-२० सामन्यांत निकालापेक्षा जास्त चर्चा खेळाडूंच्या कामगिरीची होणार हे नक्की आणि ते ही पावसाने व्यत्यय आणला नाही तर. (Ind vs SA 2nd T20)

जी अवस्था भारताची, तीच दक्षिण आफ्रिकेची आहे. त्यांच्याही गाठीशी विश्वचषकापूर्वी पाचच सामने आहेत. जानसेन आणि कोएटझी ही आफ्रिकन संघाची आशास्थानं म्हणून ओळखली जात आहेत. पण, त्यांना सरावाची आणि आपला खेळ दाखवून देण्याची फारशी संधी मिळाली नाहीए. त्यामुळे दोन्ही संघांना निदान मंगळवारचा सामना व्हावा असंच वाटत असणार. (Ind vs SA 2nd T20)

हेही वाचा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.