-
ऋजुता लुकतुके
दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा सामना कमी धावसंख्येचा आणि फिरकीपटूंच्या वर्चस्वाचा ठरला. पण, सरते शेवटी विजयाचं दान दक्षिण आफ्रिकेच्या गळ्यात पडलं. त्यांनी हा सामना ३ गडी राखून जिंकला. फक्त १२४ धावांचं संरक्षण करणाऱ्या भारतीय संघाने खरंतर आफ्रिकेची अवस्था ८६ धावांवर ७ गडी अशी केली होती. याला कारणीभूत ठरला वरण चक्रवर्ती. त्याने ४ षटकांत १६ धावा देत आप्रिकेचे ५ फलंदाज बाद केले. ५ पैकी ४ बळी त्रिफळाचीतचे होते. वरुणने अगदी विजयाच्या वाटेवर आणलं असताना हा ङास हिरावला तो आफ्रिकेच्या ट्रिस्टियन स्टब्ज (नाबाद ४७) आणि कोत्झीए (नाबाद २७) या आठव्या जोडीने. (Ind vs SA, 2nd T20)
(हेही वाचा- ‘Zomato ची ऑर्डर कॅन्सल केल्यास…’, CEO Deepender Goyal यांची नवी घोषणा)
भारतीय कर्णधार सूर्यकुमारने वरुण आणि रवी बिश्नोईची प्रत्येकी ४-४ षटकं संपल्यानंतर अक्षर पटेलच्या फिरकीऐवजी अर्शदीप सिंग आणि आवेश खानकडे चेंडू सोपवला. या दोघांच्या गोलंदाजीवर स्टब्ज आणि कोत्झीए यांनी धावा लुटल्या. त्यांनी ७ बाद ८६ वरून ४३ धावांची भागिदारी करत आफ्रिकन संघाला विजय मिळवून दिला. मालिकेत आता द आफ्रिकेनं १-१ अशी बरोबरी साधली आहे. गोलंदाजीतील पहिला बदल म्हणून सूर्यकुमारने वरुणला पाचव्या षटकांत गोलंदाजीला आणलं. लगेचच त्याने आफ्रिकन कर्णधार एडन मार्करमला ३ धावांवर त्रिफळाचीत केलं. त्यानंतर त्याने रेझा हेन्रिक, मार्को यानसेन, हेनरिक क्लासेन आणि धोकादायक डेव्हिड मिलरला वरुणने झटपट बाद केलं. सामना भारताच्या अवाक्यात आणला होता. (Ind vs SA, 2nd T20)
A thriller in Gqeberha as South Africa win the 2nd T20I by 3 wickets to level the series 1-1#TeamIndia will aim to bounce back in the next match
Scorecard – https://t.co/ojROEpNVp6#SAvIND pic.twitter.com/Cjw0ik0m4q
— BCCI (@BCCI) November 10, 2024
भारतीय फलंदाजी मात्र या सामन्यात अपयशी ठरली. सलामीवीर संजू सॅमसन भोपळाही न फोडता बाद झाला. अभिषेक शर्मा (४) तर सूर्यकुमार यादवही (४) आल्या आल्या तंबूत परतले. त्यानंतर तिलक वर्मा (२०) आणि अक्षर पटेल (२७) यांनी थोडाफार डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण, तिलक वर्माला डेव्हिड मिलरने एक अप्रतिम झेल घेत बाद केलं. तर अक्षर पटेल दुर्दैवीरित्या धावचित झाला. या पडझडीमुळे भारतीय डावात भागिदारी होऊ शकली नाही. शिवाय हार्दिक पांड्याने नाबाद ३९ धावा केल्या पण, त्यासाठी त्याने ४५ चेंडू घेतले. अगदी शेवटच्या षटकातही त्याने अर्शदीपला फलंदाजी दिली नाही. त्या नादात किमान ४ एकेरी धावा सोडल्या. षटकात चौकार निघाला एकच. भारतीय संघाची ही रणनीती अगम्य होती. शिवाय अक्षर पटेलला शेवटची षटकं न देण्याची रणनीतीही न समजण्यासारखी होती. (Ind vs SA, 2nd T20)
(हेही वाचा- भारताला अमेरिकेतील सत्तांतराची चिंता नाही; परराष्ट्रमंत्री S. Jaishankar यांनी सांगितले कारण)
सामना अटीतटीचा झाला. पण, ट्रिस्टियन स्टब्ज (४१ चेंडूंत ४७ धावा) आणि कोत्झीएनं ९ चेंडूंत १९ धावा करत सामन्याचा नूर पालटला. कोत्झीएनं १ षटकार आणि २ चौकार ठोकले. ट्रिस्टियन स्टब्जला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. आता तिसरा टी-२० सामना १३ नोव्हेंबरला सेंच्युरियन इथं आहे. (Ind vs SA, 2nd T20)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community