-
ऋजुता लुकतुके
युवा वरुण धवनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १७ धावांत ५ बळी मिळवताना आयपीएलच्या लिलावापूर्वी आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. शिवाय टी-२० क्रिकेटमधील काही विक्रमही आपल्या नावावर केले आहेत. १७ धावांत ५ बळी ही टी-२० क्रिकेटमधील भारतीय फिरकीपटूची सर्वोत्तम कामगिरी आहे. या बाबतीत आता तो कुलदीप यादवच्या बरोबर पोहोचला आहे. विशेष म्हणजे कुलदीपनेही हा विक्रम दोन वर्षांपूर्वी आफ्रिकेतच जोहानसबर्ग इथं केला होता. वरुणच्या ५ बळींपैकी चार बळी त्रिफळाचीतचे आहेत. (Ind vs SA, 2nd T20)
(हेही वाचा- Ind vs SA, 2nd T20 : वरुण चक्रवर्तीचे प्रयत्न वाया, ट्रिस्टियन स्टब्जने हिरावला भारताच्या तोंडचा घास)
१२४ धावांचं संरक्षण करताना वरुणने केलेली गोलंदाजी अप्रतिमच म्हणावी लागेल. त्यासाठीच कर्णधार सुर्यकुमारनेही त्याचं कौतुक केलं. ‘फलकावर फक्त १२५ धावा असताना वरुणने केलेल्या गोलंदाजीला दाद द्यायलाच हवी. त्याने गेली कित्येक वर्षं या क्षणाची वाट पाहिली आहे. त्याच्या मेहनतीला फळ आलेलं पाहून छान वाटतंय,’ असं सुर्यकुमार म्हणाला. (Ind vs SA, 2nd T20)
A maiden 5 wicket haul for India’s new spin sensation! 😍
Take a bow, Varun Chakaravarthy 🙌
Watch the exciting 2nd #SAvIND T20I LIVE on #JioCinema, #Sports18 & #ColorsCineplex 👈#JioCinemaSports pic.twitter.com/t5hpMC6OAJ
— JioCinema (@JioCinema) November 10, 2024
महत्त्वाचं म्हणजे पाचव्या षटकांत गोलंदाजीला आला असताना आफ्रिकन संघाची अवस्था १ बाद ३३ होती. आणि तिथून वरुणने रेझा हेन्रिक, एडन मार्करम, मार्को यानसेन, हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर अशी आफ्रिकन आघाडी आणि मधळी फळी एकहाती कापून काढली. भारतासाठी ही सर्वोत्तम कामगिरी असली तरी टी-२० मध्ये फिरकीपटूने केलेली सर्वोत्तम कामगिरी आहे पाकच्या ओमार गुलची. त्याने २००७ मध्ये आफ्रिकेविरुद्धच ६ धावांत ५ बळी मिळवले होते. (Ind vs SA, 2nd T20)
4⃣ Overs
1⃣7⃣ Runs
5⃣ WicketsVarun Chakaravarthy was an absolute rage today! 👌👌
Live ▶️ https://t.co/ojROEpNnzy #TeamIndia | #SAvIND pic.twitter.com/QJ6H5uZWYg
— BCCI (@BCCI) November 10, 2024
वरुणने आपला फिरकीचा वेग आणि टप्पा यांच्या जोरावर फलंदाजांना चकवलं. त्याच्या गुगली फलंदाज ओळखूच शकले नाहीत. त्यामुळे डेव्हिड मिलर आणि क्लासेन सारखे फलंदाज दिशा न ओळखता आल्यामुळे मामा बनले. त्याच्या ५ बळींपैकी ४ त्रिफळाचीत होते. सलग दोन सामन्यांमध्ये वरुण चक्रवर्ती सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. (Ind vs SA, 2nd T20)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community