ऋजुता लुकतुके
केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानात (Ind vs SA 2nd Test) खेळपट्टीवर ३ मीटर गवत आहे असं सगळेच सामन्या पूर्वीच्या प्रीव्ह्यूमध्ये म्हणत होते. पण, त्याचा परिणाम कसोटीवर काय होईल याची कुणी कल्पनाही केली नव्हती. नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकन कर्णधार डिन एल्गरने प्रथम फलंदाजी घेतल्यावर त्यांचा अख्खा संघ पहिल्या सत्रातच ५५ धावांत सर्वबाद झाला. आफ्रिकन संघाची घरच्या मैदानावरील ही सगळ्यात खराब कामगिरी.
भारतीय संघाला कसोटीत वर्चस्व मिळवण्याची संधी चालून आलेली असताना आणि १५३ वर ४ अशी सुस्थिती असताना. चहापानानंतर भारतीय संघानेही पुढचे ६ फलंदाज अकरा चेंडूंत आणि शून्य धावांत गमावले. कसोटीच्या पहिल्या दिवशी दोन्ही संघांचे पहिले डाव आटोपलेही. भारताकडे ९८ धावांची आघाडी राहिली.
त्यानंतर आफ्रिकन दुसरा डावही सुरू होऊन २९ षटकं उलटली आहेत. आफ्रिकन संघाने या डावात ३ बाद ६२ धावा केल्या आहेत. ते ३६ धावांनी अजूनही पिछाडीवर आहेत.
(हेही वाचा-Navi Mumbai Fire : पावणे एमआयडीसीमधील केमिकल कंपनीला आग ;अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल)
अशी ही भरपूर ॲक्शन केपटाऊनमध्ये पहिल्याच दिवशी पाहायला मिळाली.
An action-packed Day 1 in Cape Town comes to an end 🙌🏻
A total of 2️⃣3️⃣ wickets were claimed on the opening day!
South Africa 62/3 in the second innings, trail by 36 runs.
Scorecard ▶️ https://t.co/PVJRWPfGBE#TeamIndia | #SAvIND pic.twitter.com/7lo71BWms0
— BCCI (@BCCI) January 3, 2024
ही कसोटी आता दुसऱ्याच दिवशी संपण्याची दाट शक्यता आहे. दिवसभरात अडीच डाव आणि २३ गडी बाद झालेले. त्यामुळे एकाही फलंदाजाचं अर्धशतक झालेलं नसणार हा अंदाज बरोबर आहे. दिवसात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे भारताचा विराट कोहली. तो ४६ धावांवर बाद झाला.
बाकी हा दिवस गोलंदाजांचाच होता. भारतातर्फे आफ्रिकेच्या पहिल्या डावात महम्मद सिराटने ९ षटकांत फक्त १५ धावा देत ६ बळी टिपले. कसोटी क्रिकेटमध्ये पाचपेक्षा जास्त बळी मिळवण्याची ही त्याची तिसरी वेळ. ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
जसप्रीत बुमरा आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी दोन-दोन बळी मिळवत त्याला चांगली साथ दिली. त्यानंतर भारतीय पहिला डाव १५३ धावांत आटोपला तेव्हा रबाडा, एनगिडी आणि नांद्रे बर्गर या तिघांनी प्रत्येकी ३ बळी मिळवले. तर यानसेनने एकाला बाद केलं. आफ्रिकन संघाचा दुसरा डाव आता सुरू झाला आहे.
यात एडन मार्करम ३६ तर बेनिंगडन ७ धावांवर खेळत आहेत. आफ्रिकन दुसऱ्या डावात मुकेश कुमारने २ गडी बाद केले. तर बुमराला एक गडी बाद करता आला.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community