IND vs SA 2nd Test सामन्यात पहिल्या दिवशी भारतीय संघाची अत्यंत दयनीय स्थिती झाली होती. त्यामुळे हा सामना भारताच्या हातून जाणार अशी स्थिती निर्माण झाली असतानाच दुसऱ्या दिवशीच्या डावात भारताच्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी करून हा सामना भारताकडे खेचून आणला. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारताने या सामन्यात चांगला खेळ केला आणि मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली.
(हेही वाचा Shri Ram : प्रभू श्रीरामाचा अवमान केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांनंतर सुषमा अंधारेंविरोधातही गुन्हा दाखल )
मोहम्मद सिराज ( १५-६) व जसप्रीत बुमराह ( ६-६१) यांनी अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या डावात उल्लेखनीय मारा करून विजयाचा पाया रचला. त्यानंतर ७९ धावांचे माफक लक्ष्य सहज पार करून टीम इंडियाने केप टाऊनमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. २०२४ची भारताने विजयाने सुरुवात केली. केप टाऊनमध्ये कसोटी जिंकणारा रोहित शर्मा पहिला आशियाई कर्णधार ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ५५ धावांवर गुंडाळल्यानंतर भारतीय संघाला मोठी आघाडी घेऊन डावाने कसोटी जिंकण्याची संधी होती. पण, रोहित शर्मा ( ३९), शुबमन गिल ( ३६) व विराट कोहली ( ४६) वगळल्यास अन्य फलंदाज अपयशी ठरले. भारताचा पहिला डाव ४ बाद १५३ वरून सर्वबाद १५३ असा गडगडला आणि ९८ धावांच्या आघाडीवर समाधान मानावे लागले. प्रत्युत्तरात, आफ्रिकेची गाडी दुसऱ्या डावातही घसरली. पण, एडन मार्करम उभा राहिला आणि त्याच्या १०३ चेंडूंत १७ चौकार व २ षटकारांनी १०६ धावांनी भारतीय संघाची चिंता वाढवली. मात्र, जसप्रीत बुमराहने ६१ धावा देत ६ बळी घेऊन आफ्रिकेचा दुसरा डाव १७६ धावांवर गुंडाळला.
Join Our WhatsApp Community