- ऋजुता लुकतुके
दक्षिण आफ्रिकेत कसोटी विजय मिळवणं आणि सेंच्युरियनमधील पराभवाची परतफेड करणं हे भारतीय क्रिकेट संघासाठी किती महत्त्वाचं बनलं होतं हे केपटाऊनमधील विजयानंतर ड्रेसिंग रुममधील एका व्हीडिओतून समोर आलं आहे. श्रेयसने विजयी चौकार मारला तेव्हा शुभमन आणि यशस्वी लहान मुलासारखं चौका, चौका म्हणून ओरडत होते. तर विराट कोहलीने (Virat Kohli) भारावलेल्या अवस्थेत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला (Rahul Dravid) मिठी मारली.
पाच सत्रात संपलेल्या केपटाऊन कसोटीत भारताने ७ गडी राखून विजय मिळवला. आणि कसोटी मालिकेत भारतीय संघाने १-१ अशी बरोबरी साधली. केपटाऊन इथं विजय मिळवणारा भारत हा पहिला आशियाई संघ ठरला आहे. भारतीय संघाला विजयासाठी ७९ धावांची गरज असताना भारताची अवस्था ३ बाद ७६ अशी असताना श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) मार्को जानसेनला मिड-ऑफला चौकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला.
(हेही वाचा – T20 World Cup 2024 : भारत – पाक सामना ९ जूनला न्यूयॉर्कमध्ये, फायनल २९ जूनला)
आणि ड्रेसिंग रुममध्ये एकच जल्लोष झाला. बीसीसीआयने आपल्या ट्विटर खात्यावर विजयानंतरचे ड्रेसिंग रुममधले काही क्षण दाखवणारा व्हीडिओ शुक्रवारी प्रसिद्ध केला आहे. श्रेयसच्या चौकारावर शुभमन आणि यशस्वी जयसवाल चौका, चौका असं म्हणत जल्लोष करताना दिसतात.
Starting the New Year with a historic Test win at Newlands 👌👌
📽️ Relive all the moments here 🔽#TeamIndia | #SAvIND pic.twitter.com/xbpMGBXjxR
— BCCI (@BCCI) January 5, 2024
ड्रेसिंग रुममध्ये भारतीय खेळाडू विजयाची वाट पहात एकत्र जमले होते. आणि औपचारिकता पूर्ण झाल्यावर सगळ्यांचा बांध फुटला. विराट कोहलीने (Virat Kohli) मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडना (Rahul Dravid) मिठी मारली. संघातील युवा फलंदाज शुभमन आणि यशस्वी परदेशात कसोटी विजयाचा आनंद लुटताना दिसले. त्यानंतर ड्रेसिंग रुममधील जल्लोष मैदानापर्यंत पोहोचला. खेळाडूंनी धावत मैदान गाठलं.
विराट कोहलीभोवती (Virat Kohli) चाहते, प्रेक्षक आणि ग्राऊंड स्टाफचाही गराडा पडला. आणि त्यानेही न कंटाळता सगळ्यांना स्वाक्षरी दिली. तर संघाने पुरस्कार सोहळ्यानंतर नाचही केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community