Ind vs SA 2nd Test : भारतीय संघ ‘अशी’ करतोय दुसऱ्या कसोटीची तयारी 

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान दुसरी कसोटी केपटाऊनला ३ जानेवारीपासून सुरू होणार आहे 

203
Ind vs SA 2nd Test : भारतीय संघ ‘अशी’ करतोय दुसऱ्या कसोटीची तयारी 
Ind vs SA 2nd Test : भारतीय संघ ‘अशी’ करतोय दुसऱ्या कसोटीची तयारी 

ऋजुता लुकतुके

पहिल्या कसोटीतील १ डाव आणि ३२ धावांनी झालेल्या पराभवानंतर भारतीय संघाने (Ind vs SA 2nd Test) सरावात एकही दिवस सुटी घेतलेली नाही. बुधवारपासून सलग भारतीय संघाचे नेट्स सुरू आहेत. खरंतर सुरुवातीची सत्र वैकल्पिक होती. पण, कुणीही विश्रांती घेतली नाही.

आता बीसीसीआयने रविवारच्या दोन तास चाललेल्या सराव सत्राचा व्हीडिओ शेअर केला आहे.

विशेष म्हणजे शुक्रवारी खांद्याला चेंडू बसून जायबंदी झालेला शार्दूल कदमही यावेळी मैदानावर दिसला. तो आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी गोलंदाजीचा कसून सराव केला. त्यांच्याबरोबरच महम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहही मैदानात होते. आणि बुमराहने खासकरून रोहित शर्माला नेट्समध्ये गोलंदाजी केली. रोहित पहिल्या कसोटीत दोन्ही डावांत २ आणि शून्य धावांवर बाद झाला होता. एकूणच दक्षिण आफ्रिकेतील त्याची कामगिरी फारशी प्रभावी नाही. त्यामुळे रोहीतने फलंदाजी आणि बचावात्मक फटके खेळण्यावर जास्त भर दिला.

(हेही वाचा-ISRO’s Black Hole Mission : इस्रोच्या पहिल्या ‘ब्लॅक होल मिशन’चे यशस्वी प्रक्षेपण)

रोहित शर्मा मुकेश कुमारच्या गोलंदाजीलाही सामोरा गेला. तर आवेश खानही संघात सामील झाला आहे. पहिल्या कसोटीत प्रसिध आणि शार्दूल पूर्णपणे अपयशी ठरल्यामुळे रोहित मुकेश आणि आवेश यांचा पर्याय तपासून पाहत असल्याचं बोललं जात आहे.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाठदुखीमुळे पहिल्या कसोटीला मुकलेला रवींद्र जडेजा आता दुखापतीतून सावरला आहे. आणि त्याने सरावही केला. त्यामुळे अष्टपैलू खेळाडू म्हणून रवी जडेजाचाही पर्याय रोहीतकडे उपलब्ध आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.