ऋजुता लुकतुके
बुधवारपासून केपटाऊनच्या न्यूलँड्स पार्कवर होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी (Ind vs SA 2nd Test) भारतीय संघ सोमवारी केपटाऊनमध्ये दाखल झाला. खेळाडूंचा विमान प्रवास ते हॉटेलमध्ये त्यांनी केलेला प्रवेश अशा घटनांचा एक छोटा व्हीडिओ बीसीसीआयने १ जानेवारीला चाहत्यांसाठी प्रसिद्ध केला आहे.
यात मुख्य गोलंदाज महम्मद सिराज चाहत्यांना नववर्षाचं अभिष्टचिंतन करताना दिसत आहे. विमानतळावर सुरक्षारक्षकही भारतीय खेळाडूंचं स्वागत करताना दिसले.
📍Cape Town#TeamIndia have arrived for the second #SAvIND Test 👌🏻👌🏻 pic.twitter.com/VGCTdk7yzO
— BCCI (@BCCI) January 1, 2024
पहिल्या सेंच्युरियन कसोटीत भारतीय संघाचा तीन दिवसांच्या आत १ डाव आणि ३२ धावांनी पराभव झाला. आफ्रिकन संघासमोर भारताने सपशेल शरणागती पत्करलेली दिसली. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीत भारतीय संघ कमी पडला.
(हेही वाचा-Devendra Fadnavis : कायदा निर्मिती प्रक्रिया हा ज्ञान समृद्ध करणारा अनुभव)
दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकण्याच्या इराद्याने भारतीय संघ आफ्रिकेत पोहोचला. पण, पहिलीच कसोटी गमावल्यामुळे भारतीय संघ ०-१ असा पिछाडीवर आहे. आणि मालिकाही दोनच कसोटींची असल्यामुळे भारतीय संघ फार तर या मालिकेत आता बरोबरी साधू शकतो. पण, मालिका विजयाचं रोहीत शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांचं स्वप्न भंग पावलं आहे.
पहिल्या कसोटीतील पराभवानंतर सेंच्युरियनमध्ये राहून भारतीय संघाने रोज सराव केला आहे. इथं केप टाऊनलाही सोमवारी फलंदाजांनी कसून सराव केला. आता केपटाऊनमध्ये आक्रमक अंदाजात खेळण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बवुमा मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे या कसोटीत खेळणार नाहीए. आणि त्याच्या अनुपस्थितीत आपली शेवटची कसोटी खेळणारा डिन एल्गर संघाचं नेतृत्व करणार आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community