Ind vs SA 3rd ODI : भारताच्या दुसऱ्या फळीचा दक्षिण आफ्रिकेत मालिका जिंकण्याचा पराक्रम 

भारतीय संघाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आफ्रिकन संघावर ७८ धावांनी मात करत ही मालिका २-१ ने जिंकली. संजू सॅमसनचं शतक आणि अर्शदीपचे ४ बळी हे भारतीय संघाचं वैशिष्ट्य ठरलं 

1124
Ind vs SA 3rd ODI : भारताच्या दुसऱ्या फळीचा दक्षिण आफ्रिकेत मालिका जिंकण्याचा पराक्रम 
Ind vs SA 3rd ODI : भारताच्या दुसऱ्या फळीचा दक्षिण आफ्रिकेत मालिका जिंकण्याचा पराक्रम 

ऋजुता लुकतुके

के एल राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने (Ind vs SA 3rd ODI) पुन्हा एकदा एकजिनसी कामगिरी करत तिसरा एकदिवसीय सामना ७८ धावांनी जिंकला. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांच्याच घरात त्यांन २-१ ने मालिकेत धूळ चारण्याची कामगिरीही केली.

फलंदाज आणि गोलंदाज यांनी आपापली जबाबदारी चोख पार पाडली. दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर फलंदाजीत आघाडीच्या फळीने ठोस कामगिरी करण्याची गरज व्यक्त होत होती. आणि पार्लच्या मैदानावर तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या संजू सॅमसनने ही भूमिका ठोस वठवली. सुरुवातीला दुसऱ्या बाजूने दोन्ही सलामीवीर बाद झाले, कर्णधार राहुल कमनशिबी ठरला. तो ही २१ वर बाद झाला. पण, संजूने एक बाजू लावून धरली. आधी राहुल आणि मग तिलक वर्माबरोबर मोठी भागिदारी रचली. आणि संघाची धावसंख्या १९० च्या पार नेली.

(हेही वाचा-शीख पंथाचे दहावे गुरु ‘संत सिपाही’ Shri Guru Gobind Singh)

तिलक वर्मानेही ५२ धावा तर रिंकू सिंगने ३७ धावा करत त्याला चांगली साथ दिली. आफ्रिकेसमोर विजयासाठी २९७ धावांचं आव्हान होतं. डी झोर्जीने सुरुवात चांगली केली होती. पण, आफ्रिकन डावात आज मोठी भागिदारी होऊ शकली नाही. एडन मार्करम ३६ तर क्लासेन २१ धावा करून बाद झाले. त्यामुळे झोर्जीला साथ मिळाली नाही. आणि आफ्रिकन संघ ४६ षटकांत २१४ धावांवर सर्वबाद झाला.

भारतातर्फे अर्शदीप सिंगने ३० धावा देत ४ बळी मिळवले. आवेश खान आणि वॉशिंग्टन सुंदर यांनीही प्रत्येकी दोन गडी टिपले. संजू सॅमसन सामनावीर तर अर्शदीप सिंग मालिकेत सर्वोत्तम ठरला.

दक्षिण आफ्रिका (Ind vs SA 3rd ODI) दौऱ्यात आता पुढचा टप्पा कसोटी मालिकेचा आहे. आणि २६ डिसेंबरला पहिला कसोटी सामना सेंच्युरिअनमध्ये होणार आहे. विराट कोहली, रोहीत शर्मा आणि जसप्रीत बुमरा हे ज्येष्ठ खेळाडू कसोटीसाठी संघात पुनरागमन करत आहेत.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.