ऋजुता लुकतुके
भारतीय संघाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात (Ind vs SA 3rd ODI) दक्षिण आफ्रिकेचा – धावांनी पराभव करत ही मालिका २-१ अशी जिंकली. यात महत्त्वाचा वाटा होता तो तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या संजू सॅमसनच्या शतकाचा. ११४ चेंडूत १०६ धावा करताना त्याने ३ षटकार आणि ६ चौकार ठोकले. महत्त्वाचं म्हणजे के एल राहुल आणि तिलक वर्मा यांच्याबरोबर भागिदारी रचत त्याने संघाला २९० चा टप्पाही पार करून दिला.
पण, ४४व्या षटकांत जेव्हा सॅमसनने आपलं शतक पूर्ण केलं, तेव्हा त्याची एक कृती नेटकऱ्यांना वेडं करून गेली आहे.
💪 SAM-𝐓𝐎𝐍 💪#SanjuSamson #SAvINDpic.twitter.com/EKH0CcbYqe
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) December 21, 2023
या मालिकेत आतापर्यंत सहाव्या क्रमांकावर संजू सॅमसन अपयशी ठरला होता. पण, यावेळी त्याला बढती मिळाली. आणि ही संधी त्याने साधली. त्याच्या या कामगिरीचं इंटरनेटवरही कौतुक होत आहे. अनेकांनी सॅमसन अजून संपलेला नाही, असं म्हटलंय.
Hundred banane ka tarika thoda kezual hai 😌 pic.twitter.com/cVasayAwQn
— KolkataKnightRiders (@KKRiders) December 21, 2023
Is the Cricketing World Ready to witness the greatest Comeback of All Time ??
Sanju Samson has arrived with 💯 in SA
.
.#INDvsSA #SanjuSamson #RinkuSingh #IPL2024 pic.twitter.com/aAZoBh4MrH— Cypher (@cypher_twitty) December 21, 2023
The first ones are always 𝐒𝐏𝐄𝐂𝐈𝐀𝐋! ✨
Congratulations to Sanju Samson on achieving his Maiden International Century! 💯💪 #SanjuSamson #SAvIND pic.twitter.com/avp87pIkX6
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) December 21, 2023
फलंदाजांना साध देणाऱ्या खेळपट्टीवर संजू सॅमसनची बॅट आज तळपली. आणि त्याने भारताला ८ बाद २९६ अशी धावसंख्या उभारून दिली, जी भारताला मालिका जिंकण्यासाठी पुरेशी ठरली.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community