-
ऋजुता लुकतुके
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानची टी-२० मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. मालिकेतील तिसरा टी-२० सामना महत्त्वाचा ठरणार आहे. कारण, हा सामना जिंकणारा संघ ४ सामन्यांची ही मालिका हरू शकणार नाही. दरबनचा पहिला सामना संजू सॅमसनच्या शतकाच्या जोरावर भारतीय संघाने आरामात ६१ धावांनी जिंकला होता. पण, दुसऱ्या सामन्यात मात्र फलंदाज अपयशी ठरले आणि भारतीय संघाचा पराभव झाला आहे. या सामन्यानंतर ११ नोव्हेंबरला संजू सॅमसनचा वाढदिवस होता. भारतीय संघ गेबेखाहून सेंच्युरियनला तिसऱ्या सामन्यासाठी प्रवास करत होता. (Ind vs SA, 3rd T20)
(हेही वाचा- Uddhav Thackeray यांच्या बॅग तपासणीला BJP चं प्रत्त्युत्तर; देवेंद्र फडणवीसांचा ‘तो’ व्हिडिओ केला शेअर)
अशावेळी भारतीय संघाने संजू सॅमसनचा वाढदिवस प्रवासातच साजरा केला. संघाच्या बसमध्येच भारतीय खेळाडूंनी संजू सॅमसनला शुभेच्छा दिल्या. केकही कापला. बीसीसीआयने अधिकृत ट्विटर हँडलवर हा व्हीडिओ शेअर केला आहे. (Ind vs SA, 3rd T20)
It sounds like the Indian cricket team is on an exciting journey from Gqeberha to Centurion, filled with both the anticipation of the upcoming match and the joy of birthday celebrations along the way! The team seems to be enjoying their time off the field, with smiles all around…
— LiftLabFitness (@Bestmodefit) November 12, 2024
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान तिसरा टी-२० सामना शुक्रवारी जोहानसबर्ग इथं होणार आहे. या मालिकेत भारतीय संघाचा खेळ उतार चढावांनी भरलेला आहे. फलंदाज पहिल्या सामन्यात यशस्वी ठरले. पण, तेच फलंदाज दुसऱ्या सामन्यात ढेपाळले. आता तिसरा सामना जिंकायचा असेल तर भारतीय फलंदाजांनाच आपला खेळ उंचवावा लागणार आहे. (Ind vs SA, 3rd T20)
Here’s wishing a very Happy Birthday to #TeamIndia batter and ICC Men’s T20 World Cup 2024 winner, Sanju Samson 🎂😎@IamSanjuSamson pic.twitter.com/CnanMds1ig
— BCCI (@BCCI) November 11, 2024
टी-२० विश्वचषकातील विजेतेपदानंतर भारतीय संघाने टी-२० प्रकारात मालिका गमावलेली नाही. भारतीय संघाची विजयाची टक्केवारीही शंभर टक्के आहे. (Ind vs SA, 3rd T20)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community