Ind vs SA 3rd T20 : सुर्यकुमार यादवचा झंझावात, २२ धावांचं षटक आणि नवा विक्रम 

सुर्यकुमार यादवने टी-२० फलंदाजीचा आणखी एक विक्रम नावावर केला आहे 

1059
Ind vs SA 3rd T20 : सुर्यकुमार यादवचा झंझावात, २२ धावांचं षटक आणि नवा विक्रम 
Ind vs SA 3rd T20 : सुर्यकुमार यादवचा झंझावात, २२ धावांचं षटक आणि नवा विक्रम 

ऋजुता लुकतुके

जोहान्सबर्गमध्ये गुरुवारचा दिवस भारतीय कर्णधार सुर्यकुमार यादवचाच होता. टी-२० प्रकारातील या अव्वल फलंदाजाने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ (Ind vs SA 3rd T20) करत ५६ चेंडूत १०० धावा केल्या त्या ८ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने. भारतीय संघाला त्याने २०० चा टप्पा गाठून दिला.

ते करताना आपलं टी-२० मधील चौथं आंतरराष्ट्रीय शतकही ठोकलं. रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलच्या विक्रमाची बरोबरी त्याने केली. या तिघांच्या नावावर टी-२० प्रकारातील सर्वाधिक ४ शतकं आता जमा आहेत. रोहीत आणि मॅक्सवेलच्या तुलनेत सुर्यकुमारचा धावांचा वेगही जबरदस्त आहे.

रोहितने ४ शतकांसाठी ५७ डाव घेतले. तर मॅक्सवेलने १४०.

सुर्यकुमारच्या आजच्या खेळीत भारतीय डावातील १३ वं षटक महत्त्वाचं ठरलं. तोपर्यंत सुर्यकुमार जपून खेळत होता. खासकरून शाम्सी आणि महाराजची फिरकी त्याने सावधपणे खेळून काढली. पण, फेलुवायोच्या या षटकांत मात्र सुर्याने आपला गिअर बदलला. या षटकातील पहिला चेंडूवर (Ind vs SA 3rd T20) एक धाव निघाली. आणि सुर्या स्ट्राईकवर आला. दुसऱ्याच चेंडूवर त्याने जोरदार षटकार ठोकला. आणि पुढच्या तीन चेंडूंवर ४, ६ आणि ६ अशा धावा वसूल केल्या. ३२ चेंडूत सुर्याचं अर्धशतक तर साजरं झालंच. शिवाय फुलुवायोच्या या षटकांत २3 धावा निघाल्या.

या सामन्यात सुर्यकुमारने आपलं चौथं टी-२० शतक तर ठोकलंच. शिवाय भारतासाठी सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर पोहोचला. इथंही त्याचा वेग पहिल्या तिघांत जास्त आहे. रोहित शर्माने १४२ सामन्यांत १८२ षटकार ठोकले आहेत. तर सुर्यकुमार आता ५७ डावांमध्ये १२२ षटकारांवर दुसरा आहे. खालोखाल विराट कोहलीने १०७ सामन्यांमध्ये ११७ षटकार ठोकले आहेत.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.