आयपीएलनंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौरा करणार आहे. या मालिकेसाठी शुक्रवारी भारतीय संघ जाहीर करण्यात आला. मोठ्या प्रमाणात आयपीएलमध्ये चमक दाखवणा-या युवा खेळाडूंना संघात संधी मिळाली आहे. बीसीसीआयच्या निवड समितीने केलेल्या संघ निवडीवर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण आयपीएलमध्ये दमदार खेळी करुनही काही सिनियर खेळाडूंना संघात जागा देण्यात आली नाही. त्यातलेच एक नाव म्हणजे शिखर धवन.
राहुल द्रवीड काय म्हणाले
BCCI च्या निवड समितीची रविवारी बैठक होती. राहुल द्रविड, निवडकर्ते आणि कॅप्टन रोहित शर्मा यांनी संभाव्य खेळाडूंबद्दल चर्चा केली. त्यानंतर संघाची निवड करण्यात आली. यात शिखर धवनची निवड न केल्याने स्वत: राहुल द्रवीड यांनी शिखर धवनला फोन करत टी-20 क्रिकेटमध्ये टीम युवा खेळाडूंना प्राधान्य देण्याचा विचार करत असल्याचे त्याला सांगितले. टी-20 World Cup डोळ्यासमोर ठेऊन या संघाची निवड करण्यात आली आहे.
( हेही वाचा: किरकोळ बाजारात टोमॅटो ‘शंभरी’ पार )
भारतीय टी-20 संघ
केएल राहूल, ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्शल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उम्रान मलिक.
Join Our WhatsApp Community