IND vs SA Freedom Series : महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेलांच्या स्मरणार्थ भारत श्रीलंका मालिकेला ‘स्वातंत्र्य’ मालिकेचं नाव

१० डिसेंबरपासून भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा सुरू होतोय, आणि या मालिकेला स्वातंत्र्य मालिका असं नाव देण्यात आलं आहे.

211
IND vs SA Freedom Series : महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेलांच्या स्मरणार्थ भारत श्रीलंका मालिकेला 'स्वातंत्र्य' मालिकेचं नाव

ऋजुता लुकतुके

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. आणि टी-२० मालिका (IND vs SA Freedom Series) येत्या रविवारपासून (१० डिसेंबर) सुरू होतेय. दक्षिण आफ्रिकेशी भारताचं ऐतिहासिक नातं आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी पहिली सत्याग्रहाची चळवळ इथंच उभारली होती. इथं त्यांचा आश्रम होता. तर त्यांची शिकवण मानणारे नेल्सन मंडेला हे दक्षिण आफ्रिकेत वर्णभेद दूर करणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या प्रयत्नांनंतर दक्षिण आफ्रिकेत वर्णभेद दूर झाला आणि १९९२ मध्ये आफ्रिका संघावर वर्णद्वेषामुळे लादलेली बंदी हटवण्यासाठी बीसीसीआयने पुढाकार घेतला. आणि त्यानंतर आफ्रिकन संघ पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला लागला.

असं हे दोन्ही देशांचं आणि क्रिकेट संघांचं (IND vs SA Freedom Series) नातं आहे. त्यामुळे भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा म्हटल्यावर असे ऐतिहासिक संदर्भ निघणारच. त्यांना स्मरून आताच्या भारत, दक्षिण आफ्रिका दौऱ्याला आफ्रिकन क्रिकेट मंडळाने ‘स्वातंत्र्य मालिका’ असं नाव दिलंय.

(हेही वाचा – Nawab Malik प्रकरणात मनसेची उडी; ट्विट करून व्यक्त केली नाराजी)

तसा एक व्हीडिओही त्यांनी ट्विटरवर प्रसारित केला आहे.

या व्हीडिओत आतापर्यंतच्या भारताच्या आफ्रिका (IND vs SA Freedom Series) दौऱ्यातले काही निवडक क्षण दाखवण्यात आले आहेत. भारताचा दौरा १० डिसेंबरला टी-२० मालिकेनं सुरू होत आहे. १४ तारखेला तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना खेळवला जाईल. आणि त्यानंतर १७ डिसेंबरपासून तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होईल. शेवटचा एकदिवसीय सामना २१ डिसेंबरला होईल.

(हेही वाचा – Cyber Fraud : लोकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्यांना गुगलचा दणका, ‘हे’ बोगस ॲप केले डिलीट)

आणि पहिला कसोटी (IND vs SA Freedom Series) सामना बॉक्सिंग डे म्हणजे २६ डिसेंबरला सेंच्युरिअनला सुरू होईल. तर दुसरा कसोटी सामना केपटाऊनला होणार आहे. भारताने या तीनही मालिकांसाठी तीन वेगळे संघ निवडले आहेत. टी-२० संघाचं नेतृत्व सुर्यकुमार यादव, एकदिवसीय संघाचं नेतृत्व के एल राहुल आणि कसोटी संघाचं नेतृत्व विराट कोहलीकडे सोपवलं आहे. रोहीत, विराट आणि जसप्रती बुमरा टी-२० आणि एकदिवसीय मालिकेतून विश्रांती घेणार आहेत. (IND vs SA Freedom Series)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.