ऋजुता लुकतुके
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या (Ind vs SA T20) दुसऱ्या सामन्यातही पावसाचा व्यत्यय आला. पण, डकवर्थ – लुईस नियमाचा आधार घेऊन आफ्रिकन संघाला १५ षटकांत १५२ धावांचं सुधारित लक्ष्य ठेवण्यात आलं. ते ५ गडी राखून पार करत आफ्रिकन संघाने आता मालिकेतही १-० अशी आघाडी घेतली आहे.
A solid fight from #TeamIndia but it was South Africa who won the 2nd #SAvIND T20I (via DLS Method).
We will look to bounce back in the third & final T20I of the series. 👍 👍
Scorecard 👉 https://t.co/4DtSrebAgI pic.twitter.com/wfGWd7AIX4
— BCCI (@BCCI) December 12, 2023
गेबेखामध्ये आजही दुपारपर्यंत पावसाची संततधार होती. आणि नाणेफेक होऊ शकली नाही. त्यानंतर नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेनं भारताला पहिला फलंदाजी दिली तरी सामना वेळेवर सुरू होऊ शकला नाही. अखेर अर्धा तास उशिरा सामना सुरू झाला. आणि पावसामुळे हवेत असलेल्या ओलाव्याचा फायदा उचलत आफ्रिकन गोलंदाजांनी यशस्वी जयसवाल आणि शुभमन गिल या दोन्ही सलामीवीरांना शून्यावर बाद केलं. पण, खराब सुरुवातीनंतरही भारतीय फलंदाजांनी नांगी टाकली नाही. आणि तिलक वर्माने कर्णधार सुर्यकुमार यादवबरोबर आक्रमण सुरू ठेवलं. दोघांनी झटपट ४९ धावांची भागिदारी केली.
तिलक वर्माला कोतझीएनं २९ धावांवर बाद केलं. आणि पुढे सुर्यकुमारची जोडी रिंकू सिंगशी जमली. दोघांनी ७० धावांची मजबूत भागिदारी केली. सुर्यकुमार यादवने ३ षटकार ठोकत ३६ चेंडूत ५६ धावा केल्या. तर रिंकू सिंगने टी-२० प्रकारातील आपली वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्या नोंदवताना ३९ चेंडूत ६८ धावा केल्या. त्याने २ षटकार आणि ९ चौकार लगावले.
जडेजानेही १९ धावा करुन आपला वाटा उचलला. भारताने १९.३ षटकांत ७ बाद १८० धावा केल्या असताना मुसळधार पाऊस सुरू झाला. पुन्हा एकदा जवळपास(Ind vs SA T20) एका तासाचा खेळ वाया गेला. यावेळी (Ind vs SA T20) भारताचा डाव समाप्त घोषित करण्यात आला. आणि दक्षिण आफ्रिकेला १५ षटकांत विजयासाठी १५२ धावांचं सुधारित लक्ष्य देण्यात आलं.
UPDATE – Rain stops play in the 2nd T20I at St George’s Park.#TeamIndia 180/7 after 19.3 overs.https://t.co/0sPVek9NdO #SAvIND pic.twitter.com/8KbhFaOOxA
— BCCI (@BCCI) December 12, 2023
दक्षिण आफ्रिकेसाठी गेराल्ड कोत्झीएनं ३ बळी टिपले. तर तबरेझ शाम्सीने ४ षटकांत १८च धावा देत एक गडी बाद केला. एरवी फलंदाजांनी गाजवलेल्या या सामन्यात शाम्सीने चेंडूने कमाल दाखवल्यामुळे त्यालाच सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
खेळपट्टी आणि गवत ओलं असल्यामुळे चेंडूची शिवण वारंवार ओली होत होती. आणि अशा चेंडूंवर गोलंदाजी करणं काहीसं कठीण जातं. भारतीय गोलंदाजांचं तेच झालं. शिवाय रिझा हेनरिक्स आणि मॅथ्यू ब्रिट्झ यांनी सुरुवातही खणखणीत केली. पहिल्या चार षटकांतच त्यांनी ५० धावांचा टप्पा ओलांडला.
पुढे ठरावीक अंतराने मधली फळी तंबूत परतली. पण, दक्षिण आफ्रिकेचा धावांचा वेग मंदावला नाही. आणि संघाला चौकारही मिळत गेले. त्यामुळे चौदाव्या षटकांतच आफ्रिकन संघाने आव्हान पार केलं. हेनरिक्सने (Ind vs SA T20) सर्वाधिक ४९ धावा केल्या. तर ब्रिट्झ (१६), कर्णधार मार्करम (३०), डेव्हिड मिलर (१७) यांनी त्याला मोलाची साथ दिली. स्टब्ज १४ धावांवर नाबाद राहिला. भारतातर्फे सर्वच गोलंदाजांनी षटकामागे किमान ८ धावा दिल्या.
आता दक्षिण आफ्रिकेनं मालिकेत १-० अशी आघाडी घेतली असून तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना जोहानसबर्ग इथं गुरुवारी होणार आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community