ऋजुता लुकतुके
भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेची (Ind vs SA T20 Series) सुरुवात पावसाने झाली. दरबन इथला पहिला टी-२० सामना पावसात वाहून गेला. सामन्याची वेळ टळून गेली तरी पाऊस शेवटपर्यंत थांबलाच नव्हता. आणि खेळपट्टीवरील कव्हर्स काढलंच गेलं नाही. शेवटी एकही चेंडू न खेळता सामना रद्द करावा लागला.
आता पुढील सामना १२ तारखेला आणि त्याच्या पुढचा सामना १४ तारखेला होणार आहे. भारतीय कर्णधार सुर्यकुमार यादव मात्र चांगल्या मूडमध्ये होता. आणि दक्षिण आफ्रिकेत जिंकायचं असेल तर फिअरलेस क्रिकेट खेळा असा सल्ला त्याने सहकाऱ्यांना दिला आहे.
Not so great news from Durban as the 1st T20I has been called off due to incessant rains.#SAvIND pic.twitter.com/R1XW1hqhnf
— BCCI (@BCCI) December 10, 2023
फिअरलेस म्हणजे बेधडक आणि न घाबरता! पण, म्हणजे नेमकं सुर्यकुमारला काय म्हणायचंय?
‘आम्ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन आठवडे असंच क्रिकेट खेळलो. बेधडक. सामन्यात आव्हानात्मक प्रसंग आले. पण, आम्ही आक्रमक क्रिकेट सोडलं नाही. आताही खेळाडूंनी तेच केलं. आणि अख्खा संघ एकत्र आला तर जिंकणं कठीण जाणार नाही,’ असं सुर्यकुमारने सांगितलं.
सुर्यकुमारच्या हाताखाली असलेला संघ नवखा आहे. आणि त्यातल्या प्रत्येकाचा हा पहिला दक्षिण आफ्रिका दौरा आहे. अनेकांना तर आयपीएल सोडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचाही फारसा अनुभव नाही. म्हणूनच सुर्यकुमारने खेळाडूंना हा सल्ला दिला आहे. तो म्हणतो, ‘आयपीएलमध्ये भारतीय खेळाडू असंच क्रिकेट खेळतात. बिनधास्त. तसंच इथंही त्यांना खेळायचं आहे, हे मी त्यांना सांगतो. जगात सगळीकडे टी-२० सारखीच असते. इथंही दरबन आणि वाँडरर्सच्या मैदानावर षटकारांची आतषबाजी झालेली आहे. दरबनवर तर ४१ षटकार ठोकले गेलेत. तेच आम्हाला जमलं, संघ एकत्र येऊन खेळला, तर मालिका विजय अशक्य नाही.’
दक्षिण आफ्रिकेत आल्यापासून भारतीय संघाला जेमतेम दीड दिवस सराव करता आला आहे. सामन्याच्या आदल्या दिवसापर्यंत इथं पाऊस नव्हता.
First practice session in South Africa 👍
Interaction with Head Coach Rahul Dravid 💬
Fun, music & enjoyment with teammates 🎶In conversation with @rinkusingh235 👌 👌 – By @RajalArora
P. S. – Don’t miss @ShubmanGill‘s special appearance 😎
Full Interview 🎥 🔽 #TeamIndia |… pic.twitter.com/I52iES9Afs
— BCCI (@BCCI) December 9, 2023
पण, रविवारी मात्र इथं पाऊस सुरू झाला. अलीकडे ऑस्ट्रेलिया विरुद्ध मिळवलेल्या विजयामुळे युवा खेळाडूंमध्ये जोश आहे. आणि दक्षिण आफ्रिकेत खेळतानाही ते सकारात्मक आहेत, असं सुर्यकुमारने आवर्जून सांगितलं.
Join Our WhatsApp Community