ऋजुता लुकतुके
नवीन हंगामात भारतीय संघाचा पहिला परदेश दौरा (Ind vs SA T20 Series) आहे तो दक्षिण आफ्रिकेचा. आणि त्यासाठी भारताचा टी-२० संघ गुरुवारी सकाळी दक्षिण आफ्रिकेत दरबन इथं दाखल झाला. संघाच्या स्वागतासाठी विमानतळाबाहेर चाहत्यांनी गर्दी केली होती. तर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनीही संघाचां जोरदार स्वागत केलं. आणि भारतीय खेळाडूंबरोबर फोटोही काढले.
अगदी कर्णधार सुर्यकुमार यादवसह संघातील बहुतेक खेळाडूंचा हा पहिलाच दक्षिण आफ्रिका दौरा आहे. त्यामुळे खेळाडूंमध्ये उत्साह दिसून आला. ताज्या दमाच्या संघातील वातावऱणही खेळीमेळीचं होतं. दरबनमधील उकाड्याचा सामना करण्यासाठी खेळाडूंनी आपली ट्रॉली बॅग डोक्यावर छत्रीसारखी धरली होती.
बीसीसीआयने खेळाडूंचा मुंबईहून निघतानाचा आणि दरबनला पोहोचल्यावरचा मिळून एक व्हीडिओ प्रसिद्ध केला आहे.
South Africa bound ✈️🇿🇦#TeamIndia are here 👌👌#SAvIND pic.twitter.com/V2ES96GDw8
— BCCI (@BCCI) December 7, 2023
३ टी-२० सामन्यांची मालिका १० डिसेंबरपासून सुरू होत आहे. १४ डिसेंबरला ही मालिका संपल्यावर १७ ते २१ दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका रंगेल. आणि त्यानंतर पहिला कसोटी सामना २६ डिसेंबरला सेंच्युरिअनला होईल. आणि दुसरी कसोटी सामना केपटाऊनला होणार आहे.
बीसीसीआयच्या व्हीडिओत यशस्वी जयसवाल, महम्मद सिराज, प्रशिक्षक राहुल द्रविड, सुर्यकुमार यादव, ऋतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यर हे खेळाडू दिसत आहेत.
विराट कोहली, रोहीत शर्मा आणि जसप्रीत बुमरा या खेळाडूंनी टी-२० (Ind vs SA T20 Series) तसंच एकदिवसीय मालिकेत विश्रांती घेतली आहे. तर तीनही प्रकारच्या मालिकांसाठी भारताचे तीन वेगवेगळे संघ निवडण्यात आले आहेत. आणि यशस्वी जयसवाल हा एकमेव खेळाडू तीनही संघांचा भाग आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community