- ऋजुता लुकतुके
एकीकडे कसोटी मालिकेत न्यूझीलंड विरुद्ध ०-३ ने पराभव झालेला असताना, भारतीय संघाचं आंतरराष्ट्रीय वेळापत्रक व्यस्तच आहे. सध्या टी-२० संघाने दक्षिण आफ्रिकेतील आपली मोहीम सुरूही केली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आफ्रिकेत ४ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारे ४ खेळाडू या संघात आहेत आणि अनेकांचा हा पहिलाच दक्षिण आफ्रिका दौरा आहे. (Ind vs SA, T20 Series)
अशावेळी बीसीसीआयने खेळाडूंचा पहिला व्हिडिओ दक्षिण आफ्रिकेतून सोशल मीडियावर प्रसिद्ध केला आहे. यात खेळाडू एकमेकांचं सामान्य ज्ञान आणि त्यातही आफ्रिकन देशाबद्दलचं ज्ञान तपासत आहेत. प्रश्न विचारण्याची जबाबदारी अभिषेक शर्मा आणि अक्षर पटेल यांनी उचलली आहे. (Ind vs SA, T20 Series)
Touchdown Durban 🛬🇿🇦
How good is #TeamIndia‘s knowledge of their next destination 🤔#SAvIND pic.twitter.com/m4YjikAw6Y
— BCCI (@BCCI) November 4, 2024
(हेही वाचा – Ind vs NZ, 3rd Test : भारताचे ‘हे’ ४ दिग्गज खेळाडू भारतात शेवटची कसोटी खेळले का?)
पहिला टी-२० सामना ८ नोव्हेंबरला दरबान इथं होणार आहे. या संघाबरोबर बदली प्रशिक्षक म्हणून व्ही व्ही एस लक्ष्मण आले आहेत आणि क्रिकेट अकादमीतील त्यांचा सहाय्यक प्रशिक्षक वर्ग त्यांच्याबरोबर आहे. तर गौतम गंभीर आणि इतर प्रशिक्षक वर्ग हा ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या तयारीत गुंतला आहे. नुकत्याच न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघातील अनेक कच्चे दुवे उघड झाले आहेत. २२ नोव्हेंबरला लगेचच भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऑस्ट्रेलियात खेळायचं आहे. त्यामुळे गंभीर आणि भारतीय संघ त्या दौऱ्याची तयारी करत आहे. अशावेळी युवा संघ दक्षिण आफ्रिकेत टी-२० मालिका खेळत आहे. (Ind vs SA, T20 Series)
भारतीय टी-२० संघ – सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार व्यक्ष, आवेश खान व यश दयाल
हेही पहा –
Join Our WhatsApp Community