ऋजुता लुकतुके
भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्यानचा पहिला टी-२० सामना (Ind vs SA T20 Series) पावसात वाहून गेला. पण, दोन्ही संघातील खेळाडू विश्वचषक स्पर्धेनंतरची दुसरी मालिका खेळताना छान मूडमध्ये आहेत. या मालिकेच्या फ्रीडम चषकाचं अनावरण दोन्ही संघांच्या कर्णधारांच्या हस्ते करण्यात आलं. आणि तेव्हाही दोघांमध्ये बरेच हास्यविनोद झाले. खेळाडूंमधील वातावरणही मोकळेपणाचं आहे.
दोन्ही कर्णधारांना स्टेडिअममध्ये पारंपरिक रिक्षातून आणण्यात आलं. दोन्ही रिक्षा सजवलेल्या होत्या. आणि चषकाच्या अनावरणापूर्वी कर्णधार ‘रॉक, पेपर सिझर्स’ हा खेळही खेळले. बीसीसीआयने या कार्यक्रमाचा एक छोटासा व्हीडिओ ट्विटरवर टाकला आहे.
Smiles ☺️
Cheers 👏
Banter 😉How about that for a #SAvIND T20I series Trophy Unveiling! 🏆 👌#TeamIndia | @surya_14kumar pic.twitter.com/fxlVjIgT3U
— BCCI (@BCCI) December 10, 2023
दोन्ही संघांदरम्यान आधी टी-२० मालिका होणार आहे. १० ते १४ डिसेंबर दरम्यान टी-२० मालिका संपल्यावर लगेचच १७ डिसेंबरला एकदिवसीय मालिका सुरू होईल. १७,१९ आणि २१ तारखेला तीन एकदिवसीय सामने (Ind vs SA T20 Series) होतील. आणि त्यानंतर कसोटी मालिका २६ डिसेंबरला बॉक्सिंग डे (Ind vs SA T20 Series) कसोटीने सुरू होईल.
कसोटी संघात विराट कोहली, रोहीत शर्मा आणि जसप्रीत बुमरा भारतीय संघात परततील. आणि दोन्ही संघ तुल्यबळ असतील. त्यामुळे या मालिकेकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. भारतीय संघाने कसोटी खेळणाऱ्या इतर सर्व संघांबरोबर परदेशात कसोटी मालिका जिंकल्या आहेत. पण, तशी कामगिरी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आफ्रिकेत केलेली नाही. सध्याचा संघाचा फॉर्म बघता, भारतीय संघाला सध्या ती संधी आहे, असं बोललं जात आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community