IND vs SA T20 World Cup : समोरासमोर न भिडता भारताने पाकिस्तानला केले विश्वचषकातून ‘आऊट’

158

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० क्रिकेट सामन्यावर भारतीयांपेक्षा अधिक लक्ष हे पाकड्यांचे होते, कारण जर भारत हा सामना जिंकतो तर ग्रुप बी मध्ये दक्षिण आफ्रिकेचा गुणांक कमी होतो आणि पाकिस्तानची टी-२० वर्ल्ड कप मध्ये स्थान कायम राहील, अशी अपेक्षा होती, मात्र भारताचा या सामन्यात पराभव झाला आणि दुःख मात्र पाकिस्तानला झाले आहे. पाकिस्तानची टी-२० वर्ल्ड कपमधील स्थान आता अडचणीत सापडले आहे. भारताच्या या पराभवामुळे पाकिस्तानच्या सेमी फायनलमध्ये जाण्याच्या आशा जवळपास धुळीस मिळाल्या.

काय घडले सामन्यात?

रविवारी, ३० ऑक्टोबर रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना शेवटपर्यंत रंगतदार होता. भारताने ९ गडी बाद १३३ धावा काढल्या होत्या. मात्र दक्षिण आफ्रिकेने ५ गडी बाद १३७ धावणे सामना जिंकला. टीम इंडियाला २३ धावांवर पहिला धक्का बसला. कर्णधार रोहित शर्मा १४ चेंडूत १५ धावा करून बाद झाला. त्यानंतर विकेट्सची झुंबड उडाली. केएल राहुल ९ धावा तर विराट कोहली १२ धावा काढून बाद झाला. तिघांनाही लुंगी एनगिडीने तंबूत पाठवले. यानंतर अक्षर पटेलच्या जागी संघात समाविष्ट करण्यात आलेला दीपक हुडाही अपयशी ठरला. त्याला खातेही उघडता आले नाही. हुडाला नॉर्टजेने यष्टिरक्षक डी कॉकच्या हाती झेलबाद केले. त्यानंतर हार्दिक पंड्या दोन धावा करून बाद झाला. एनगिडीने हार्दिकला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. ४९ धावांवर पाच विकेट पडल्यानंतर सूर्यकुमार यादवने दिनेश कार्तिकसह टीम इंडियाचा डाव सावरला. दोघांनी सहाव्या विकेटसाठी ४० चेंडूत ५२ धावांची भागीदारी केली. सूर्यकुमारने ३० चेंडूंमध्ये टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ११वे अर्धशतक ठोकले. या दोघांनी मिळून भारताला १०० धावांच्या पुढे नेले. आफ्रिकेने ५ विकेट्स राखून सामना जिंकला. मिलरने ४६ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ५९ धावा केल्या. आफ्रिकने ५ बाद १३७ धावा केल्या.पाकिस्तान बाद…आफ्रिकेने या विजयासह ५ गुणांची कमाई करून अव्वल स्थानी झेप घेतली. भारत व बांगलादेश प्रत्येकी ४ गुणांसह  दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. झिम्बाब्वेच्या खात्यात ३ गुण आहेत. पाकिस्तानचे दोन सामने शिल्लक आहेत आणि त्यांन आफ्रिका व बांगलादेशचा सामना करायचा आहे. अशात दोन्ही सामने जिंकून पाकिस्तानचे ६ गुण होऊ शकतात. तेच आफ्रिकेला दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सचा सामना करायचा आहे आणि ते हा सामना सहज जिंकून ७ गुणांसह अव्वल स्थान पटकावू शकतात. भारताचे दोन सामने शिल्लक आहेत आणि त्यांच्यासमोर झिम्बाब्वे व बांगलादेश यांचे आव्हान आहे. यापैकी एक सामना जिंकून भारत उपांत्य फेरीत नेट रन रेटच्या जोरावर पोहोचू शकतो.

(हेही वाचा देशात सामान नागरी कायदा लागू करण्याच्या हालचालींना वेग, काय म्हणतात तज्ज्ञ?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.