IND Vs SA: भारतीय संघाची होणार निवड; विराट आणि रोहितला मिळणार आराम?

78

29 मे ला 2022 च्या आयपीएलचा हंगाम संपणार आहे. आयपीएलनंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौरा करणार आहे. या मालिकेसाठी शुक्रवारी भारतीय संघाची निवड केली जाणार आहे. या दौ-यात दक्षिण आफ्रिकेला भारताशी पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. यामध्ये आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणा-या खेळाडूला संधी मिळू शकते. दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या यांचे नाव आघाडीवर आहे.

विराट आणि रोहितला आराम?

भारतीय संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरोधात पाच सामन्याची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेत भारताच्या दिग्गज खेळाडूंना आराम मिळण्याची शक्यता आहे. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, विकेटकिपर ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि केएल राहुल यांना दक्षिण आफ्रिका दौ-यातून आराम मिळणार आहे.

( हेही वाचा: म्हणून मी माझा अयोध्या दौरा रद्द केला… राज ठाकरेंनी सांगितलं धक्कादायक कारण )

हार्दिक पांड्याकडे धुरा सोपवणार?

दक्षिण आफ्रिकेविरोधात मालिकेतून भारतीय संघात पुन्हा अष्टपैलू हार्दिक पांड्या पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे हार्दिक पांड्याने यशस्वी नेतृत्व केले. हार्दिकच्या नेतृत्व गुणांनी सर्वांनाच प्रभावित केले आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका विरोधातील टी-20 मालिकेत रोहितच्या अनुपस्थितीत संघाची धुरा हार्दिक पांड्याकडे सोपवण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.