IND vs SA U19 Women’s T20 WC : भारताच्या पोरी ‘लय भारी’!​ भारत सलग दुसऱ्यांदा अंडर-19 महिला टी-20 विश्वविजेता

42
IND vs SA U19 Women’s T20 WC : भारताच्या पोरी 'लय भारी'!​ भारत सलग दुसऱ्यांदा अंडर-19 महिला टी-20 विश्वविजेता
IND vs SA U19 Women’s T20 WC : भारताच्या पोरी 'लय भारी'!​ भारत सलग दुसऱ्यांदा अंडर-19 महिला टी-20 विश्वविजेता

भारताने सलग दुसऱ्यांदा महिला अंडर-19 टी-20 विश्वचषक (IND vs SA U19 Women’s T20 WC ) जिंकला आहे. भारतीय संघाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 9 गडी राखून पराभव केला. भारताने 2023 मध्ये स्पर्धेचे पहिले विजेतेपद पटकावले होते. क्वालालंपूर येथे रविवारी (2 फेब्रु.) दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि 20 षटकांत सर्वबाद 82 धावा केल्या. (IND vs SA U19 Women’s T20 WC )

हेही वाचा-Pandharpur Vivah Sohala : वसंत पंचमीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा संपन्न ; हजारो भक्तांची मांदियाळी

भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे आफ्रिकेचा संघ अवघ्या ८२ धावांत सर्वबाद झाला. २३ धावा ही आफ्रिकन फलंदाजांची या सामन्यातील सर्वात मोठी धावसंख्या होती. दक्षिण आफ्रिकेने पहिल्याच षटकात चांगली सुरूवात केली, पण त्यानंतर त्यांना एकेका धावेसाठी झगडावं लागलं. (IND vs SA U19 Women’s T20 WC )

हेही वाचा-Mahakumbh Stampede : तिसऱ्या अमृत स्नाननिमित्त पोलिस हाय अलर्टवर ; कडक तपासणी सुरू

प्रत्युत्तरात भारतीय संघाने 11.2 षटकांत 1 गडी गमावून 83 धावांचे लक्ष्य गाठले. जी त्रिशाने (Trisha) 33 चेंडूत 44 धावांची खेळी केली. याशिवाय तिने गोलंदाजीतही ३ विकेट्स घेतल्या. सानिका चालकेने (Sanika Chalke) 22 चेंडूत 26 धावांची नाबाद खेळी खेळली. याशिवाय पारूनिका सिसोदिया (Parunika Sisodia), वैष्णवी शर्मा (Vaishnavi Sharma) आणि आयुषी या फिरकी त्रिकुटाने भारताचा विजय अधिक सोपा केला. (IND vs SA U19 Women’s T20 WC )

हेही वाचा-Custom Duty हटवण्यात आलेल्या ३६ जीवरक्षक औषधांची यादी; कर्करोगावरील औषधांना प्राधान्य

दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या ८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या विक्रमी कामगिरी करणाऱ्या सलामी जोडीने चांगलीच सुरूवात केली. कमालिनी ८ धावा करत लवकर बाद झाली. यानंतर उपकर्णधार सानिका चाळके आणि गोंगाडी त्रिशा हिने चांगली भागीदारी रचत भारताला मोठा विजय मिळवून दिला. त्रिशाने ३३ चेंडूत ८ चौकारांसह ४४ धावांची नाबाद खेळी केली. तर सानिका चाळकेने २२ चेंडूत ४ चौकारांसह २६ धावांची खेळी केली आणि विजयी चौकारासह भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. (IND vs SA U19 Women’s T20 WC )

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.