IND Vs SRI: विराट-हार्दिकमध्ये बिनसलं? व्हायरल होणा-या ‘त्या’ व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू अशी ओळख असणारा विराट कोहली अनेकांसाठी आदर्श आहे. भारतीय संघामध्ये नव्याने येणा-या खेळाडूंसाठी सुद्धा त्याच्यासोबत खेळणे म्हणजे पर्वणी. हार्दिक पांड्यापासून ते के एल राहूलपर्यंतच्या सर्वच खेळाडूंसाठी विराट म्हणजे आदर, प्रेम. परंतु आता मात्र व्हायरल होणा-या एका व्हिडीओमध्ये विराट आणि ख-या अर्थाने त्याच्या प्रभावात असणारा हार्दिक पांड्या या दोघांमध्येही काहीच आलबेल नसल्याचे म्हटले जात आहे.

गुवाहाटीत झालेल्या सामन्यातील व्हिडीओ भारतीय संघनाने नुकतेच गुवाहाटीमध्ये पार पडलेल्या एकदिवसीय सामन्यामध्ये श्रीलंकेचा पराभव केला. पण ,हा समाना संघाच्या विजयापेक्षा जास्त चर्तेत राहिला तो म्हणजे विराट आणि पांड्याच्या वादमुळे.

नेमकं घडलं काय? पहिल्या प्रसंगामध्ये विराटला धाव घेण्यापासून रोखले आणि त्याचा हा निर्णय विराटला पटला नाही. त्याने डोळ्यातूनच धाक देत पांड्याला आपण नाराज असल्याचे स्पष्ट केले. यावेळी पंड्याने काही कारणास्तव त्याच्य नजरेला नजरच दिली नाही. यानंतर सामन्यादरम्यान आणखी एका क्षणीसुद्धा त्यांच्यामध्ये असे काही घडले की इथेही विराटचे संतप्त हावभाव सर्वांनीच पाहिले.

( हेही वाचा: भारताचा ‘विराट’ विजय! श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत घेतली आघाडी )

नेटक-यांचा पंड्याला सल्ला

तसे पाहिले तर पांड्या आणि विराट हे दोन्ही खेळाडू त्यांच्यामध्ये असणा-या मजेशीर नात्यासाठीसुद्धा ओळखले जातात. पण, सध्या मात्र नात्याने रुप बदलेले, की पांड्याला उपकर्णधारपदाची हवा लागली हे कळेना अशाच प्रतिक्रिया क्रिकेटप्रेमी देत आहेत. इतकेच काय, तर ते त्याला जमिनीवर राहा,जास्त हवेत जाऊ नकोस, अशा आशयाचे सल्लेही देताना दिसत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here