भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) रविवारी पुन्हा एकदा त्याचा उत्तम खेळ दाखवला. श्रीलंकेविरुद्धच्या ( India Vs Shri Lanka) तिस-या वनडे सामन्यात त्याने शतक ठोकले. हे त्याचे 46 वे वनडे शकत होते. रविवारी झालेल्या सामन्यात श्रीलंकेविरुद्धच्या तिस-या वनडे सामन्यात विराट कोहलीने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. त्याने या सिरिजमधील दुसरे शतक झळकावले असून, कोहलीचे हे 74 वे आंतरराष्ट्रीय शतक (International Century) आहे. या खेळीसह आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट घडली आहे. कोहलीने 15 जानेवारीला चौथ्यांदा शतक झळकावले आहे.
( हेही वाचा ….म्हणून श्रीलंकेचे 9 खेळाडू बाद झाले असतानाच दिलं ऑल आऊट; जाणून घ्या यामागील कारण )
15 जानेवारी आणि विराटची शतके
यापूर्वी त्याने 2017 मध्ये इंग्लंडविरुद्ध ( England) वनडे सामन्यात 122 रसन्स केले होते. तर 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) टेस्ट सामन्यात 153 धावांची खेळी त्याने केली होती. 2019 मध्ये 15 जानेवारीलादेखील कोहलीने शतक झळकावले होते. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 104 रन्सची उत्तम इनिंग खेळली होती. तर रविवारी कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या 43 व्या ओव्हरमध्ये शेवटच्या बाॅलवर सिंगल रन घेत 46 वे वनडे शतक पूर्ण केले आहे.
Join Our WhatsApp Community