वनडे मालिकेआधीच भारतीय संघाला मोठा फटका; ‘हा’ खेळाडू संघाबाहेर

टी-20 मालिका जिंकल्यानंतर आता भारत आणि श्रीलंकादरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेलवली जाणार आहे. 10 जानेवारीपासून सुरु होणा-या या मालिकेआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह बाहेर पडला आहे. काही दिवसांपूर्वीच जसप्रीत बुमराहचा भारतीय एकदिवसीय संघात अचानक समावेश करण्यात आला होता. पण आता पुन्हा त्याला संघाबाहेर करण्यात आले आहे.

( हेही वाचा: सावरकर तायक्वांडो अकादमीच्या खेळाडूंचे सुयश; सुवर्ण आणि रजत पदकाची कमाई )

मिळालेल्या माहितीनुसार, बुमराह इतर खेळाडूंबरोबर गुवाहाटीला पोहोचला नाही. गुवाहाटीला 10 जानेवारीला पहिला एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. लंकेविरुद्ध बीसीसीआयने एकदिवसीय संघ जाहीर केल्यानंतर प्रकाशित केलेल्या यादीत जसप्रीत बुमराहचे नाव नव्हते. 2023 ला एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपचे वर्ष आहे. त्यामुळे बीसीसीआय कोणताही धोका पत्करुन इच्छित नाही. यामुळे बुमराहला पूर्णपणे बरे होण्यासाठी वेळ देण्यात आला आहे.

एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा ( कर्णधार), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहूल ( विकेटकीपर), विराट कोहली, शुभमन गिल, अक्षर पटेल, वाॅसिंगटन सुंदर, हार्दिक पंड्या ( उप कर्णधार), ईशान किशन (विकेट कीपर), युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here