….म्हणून श्रीलंकेचे 9 खेळाडू बाद झाले असतानाच दिलं ऑल आऊट; जाणून घ्या यामागील कारण

84

भारताने श्रीलंकेला 317 धावांनी पराभूत करत, मोठा विजय आपल्या नावावर केला. पण सामन्यात श्रीलंकेचे 9 फलंदाजच बाद झाले. पण तरीही त्यानंतर श्रीलंका ऑल आऊट झाल्याचे सांगत भारताला विजयी घोषित करण्यात आले. (India Vs Shrilnka) श्रीलंकेची ( Shrilanka) 8 बाद 51 अशी बिकट अवस्था झाली होती. त्यानंतर कुलदीप यादवने विकेट मिळवत श्रीलंकेचे 9 बाद 73 अशी स्थिती झाली. त्यानंतर चाहते श्रीलंकेच्या अखेरच्या फलंदाजाची वाट पाहत होते. श्रीलंकेचा अखेरचा फलंदाज होता अशेन बंदारा (Ashen Bandara). परंतु क्षेत्ररक्षण करताना बंदाराला दुखापत झाली होती. बंदारा आणि श्रीलंकेचा अजून एक खेळाडू यांची टक्कर झाली होती. त्यामुळे 9 विकेट्स झाल्यावर श्रीलंकेने डाव घोषित केला.

( हेही वाचा: ‘वन-डे’मध्ये विराटच बेस्ट; विश्वविक्रमापासून तीन शतके दूर )

भारतीय गोलंदाजांकडून श्रीलंकेच्या फलंदाजांचा धुव्वा

भारताने दिलेल्या 390 धावांचा डोंगर गाठताना, श्रीलंकेच्या संघाला 100 धावांची वेसही ओलांडता आली नाही. श्रीलंकेचा डाव 73 धावांत आटोपला आणि त्यामुळेच भारताला 317 धावांनी मोठा विजय मिळवता आला. विराट कोहली नाबाद 166 आणि शुभमन गिल 116 यांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने 350 धावांचा टप्पा पार केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.