श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना, निर्धारित 20 षटकात 6 बाद 206 धावांचा डोंगर उभारला आहे. भारताकडून अर्शदीपने त्याच्या दोन षटकांत एकूण 5 नो बाॅल फेकले आणि 37 धावा दिल्या.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर खेळवला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून श्रीलंकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 6 बाद 206 धावांचा डोंगर उभा केला.
या सामन्यात भारताकडून राहुल त्रिपाठीला पदार्पणाची संधी मिळाली. त्याचवेळी वेगवान फलंदाज अर्शदीप सिंगही बरा होऊन प्लेइंग-11 मध्ये परतला. मात्र, हा सामना अर्शदीपसाठी फारसा चांगला ठरला नाही. श्रीलंकेच्या डावातील दुसरे षटक टाकायला आलेल्या अर्शदीप सिंगने त्या षटकात सलग 3 नो-बाॅल टाकले. अर्शदीपच्या त्या षटकात एकूण 21 धावा निघाल्या. एवढेच नाही तर अर्शदीपने डावाच्या 19 व्या षटकात पुन्हा 2 नो- बाॅलही टाकले. म्हणजेच अर्शदीपने त्याच्या दोन षटकांत एकूण 5 नो बाॅल फेकले आणि 37 धावा दिल्या.
( हेही वाचा: Asia Cup 2023 : भारत – पाकिस्तान सामने होणार की नाही? जय शहांनी केली घोषणा )
नेटक-यांचा मीम्सचा वर्षाव
अर्शदीप सिंगच्या या कामगिरीने भारतीय चाहते आश्चर्यचकित झाले. त्यांनी ट्विटरवर मीम्सच्या माध्यमातून अर्शदीपला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. एका चाहत्याने लिहिले की, भाई काय करतोयस. त्याचवेळी एकाने लिहिले की, अर्शदीप कसला रेकाॅर्ड बनवत आहेस.
Arshdeep Singh bhai kya kar rhe ho yaar #INDvsSL pic.twitter.com/EwnSdChM53
— Sudhanshu Ranjan Singh (@memegineers_) January 5, 2023