-
ऋजुता लुकतुके
क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा आहे असं म्हणतात. पण, अनिश्तितता दर वेळी वेगवेगळ्या प्रकारची असते. श्रीलंकेविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताची अवस्था ८ बाद २३० अशी असताना आणि विजयासाठी १४ चेंडूंत अवघ्या एका धावेची गरज असताना लागोपाठच्या चेंडूवर दोन फलंदाज बाद झाले आणि अखेर हा सामना बरोबरीत सुटला. अचानक मिळालेल्या या कलाटणीमुळे प्रेक्षकांचं मात्र मनोरंजन झालं. भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हातातून विजय निसटल्यामुळे काहीसा वैतागला. (Ind vs SL, 1st ODI)
(हेही वाचा- Ladki Bahin Yojana : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेचे मराठीमधील अर्ज मंजूर होणार!)
कोलंबोच्या प्रेमदासा मैदानावर लंकन कर्णधार असालंकाने नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी घेतली. पण, अविष्का फर्नांडो (Avishka Fernando) (१) आणि कुसल मेंडिस (Kusal Mendis) (१४) हे आतापर्यंत फॉर्ममध्ये असलेले फलंदाज झटपट बाद झाल्यामुळे लंकन संघ अडचणीत सापडला होता. त्यानंतर समरविक्रमा आणि असालंकाही फारशी कमाल दाखवू शकले नाहीत. पण, दुनित वेलालगेनं सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत ६५ चेंडूंत ६७ धावा केल्या आणि लंकन डावाला आकार दिला. लियानागे (Liyanage)आणि हसरंगा (Hasaranga) यांच्याबरोबर छोटेखानी भागिदारी करत त्याने लंकन संघाला २३० पर्यंत आणलं. (Ind vs SL, 1st ODI)
Things went down to the wire in Colombo as the match ends in a tie!
On to the next one.
Scorecard ▶️ https://t.co/4fYsNEzggf#TeamIndia | #SLvIND pic.twitter.com/yzhxoyaaet
— BCCI (@BCCI) August 2, 2024
भारताकडून अर्शदीप (Arshdeep) आणि अक्षर पटेल (Axar Patel) यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. एरवी २३० ही धावसंख्या भारतासाठी सहज सोपी वाटत होती. बाराव्या षटकात रोहित आणि शुभमन यांनी ७५ धावांची सलामीही दिली होती. पण, इथून रोहित (Rohit Sharma) (५८), शुभमन (Shubman) (२४), सुंदर (Sundar) (५) आणि विराट कोहली (Virat Kohli) (२४) हे फलंदाज एकामागून एक बाद झाले. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) २३ धावांवर बाद झाल्यावर तर भारताची अवस्था ५ बाद १३६ अशी झाली. के एल राहुलने (KL Rahul) ३१ आणि अक्षर पटेलने ३३ धावा करत भारताला दोनशेच्या पार नेलं. त्यानंतर शिवम दुबेनंही मोलाच्या २५ धावा केल्या. (Ind vs SL, 1st ODI)
(हेही वाचा- BSF Officers : गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय! वाढत्या दहशतवादी हल्ल्यांमुळे बीएसएफच्या महासंचालकांना पदावरून हटवलं)
अशावेळी सामन्याचं ४८ वं षटक निर्णायक ठरलं. लंकन कर्णधार असालंकाने चेंडू त्यात्या हातात घेतला. शिवम दुबेनं त्याला एक जोरदार षटकार खेचला. भारताला ८ बाद २३० वर नेऊन ठेवलं. आता भारताला पुढच्या १५ चेंडूंत फक्त एक धाव विजयासाठी हवी होती. पण, पुढच्याच चेंडूवर शिवम दुबे पायचित झाला. तरी १४ चेंडूंत १ धाव हे गणित जमण्यासारखं होतं. पण, इतक्यात अर्शदीपही पुढच्याच चेंडूवर पायचित झाला. सामना बरोबरीत सुटला. असालकाने संघाला बरोबरी साधून दिली. मालिकेतील पुढचा सामना ४ तारखेला होणार आहे. (Ind vs SL, 1st ODI)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community