Ind vs SL, 1st ODI : मोठा फटका मारून तो हीरो व्हायला गेला, बाद झाल्यावर झाला ट्रोल

Ind vs SL, 1st ODI : अर्शदीपच्या बाद होण्याच्या पद्धतीमुळे तो सध्या चर्चेचा विषय झाला आहे

576
Ind vs SL, 1st ODI : मोठा फटका मारून तो हीरो व्हायला गेला, बाद झाल्यावर झाला ट्रोल
Ind vs SL, 1st ODI : मोठा फटका मारून तो हीरो व्हायला गेला, बाद झाल्यावर झाला ट्रोल
  • ऋजुता लुकतुके

भारत विरुद्ध श्रीलंका (Ind vs SL, 1st ODI) पहिला एकदिवसीय सामना रंगतदार अवस्थेत बरोबरीत सुटला. भारतीय संघाला ४८ व्या षटकांत विजयासाठी फक्त एका धावेची गरज होती. हातात १४ चेंडू होते. अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) आणि मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) ही शेवटची जोडी मैदानात होती. फलंदाजीला अर्शदीप होता. एक धाव हवी असताना असालंकाच्या एका आत आलेल्या चेंडूवर अर्शदीप मोठा फटका खेळायला गेला. त्याला स्विपचा फटका खेळायचा होता. पण, प्रत्यक्षात चेंडू बॅटला लागलाच नाही. तो यष्टीसमोर असल्यामुळे पायचितचा सोपा बळी ठरला.

(हेही वाचा- Paris Olympic 2024 : मनू भाकेरची २५ मीटर अंतिम फेरी;  दीपिका कुमारी, भजन कौर यांना अखेरची संधी  )

सामना संपल्यानंतर कर्णधार रोहित शर्मानेही (Rohit Sharma) अप्रत्यक्षपणे अर्शदीपला सुनावलं. ‘१४ चेंडूंत १ धाव हवी असताना सामना बरोबरीत सुटला यावर मी समाधानी नाही. कसंही करून ती एक धाव झाली पाहिजे होती. आम्ही हातातील सामना सोडला, असंच म्हणावं लागेल,’ असं रोहीत स्पष्टपणे म्हणाला. (Ind vs SL, 1st ODI)

असालंकाचं हे षटक सनसनाटीच ठरलं. षटकातील तिसऱ्या चेंडूवर त्याने आधी शिवम दुबेला (Shivam Dube) बाद केलं. शिवमने आधीच्याच चेंडूवर षटकार ठोकला होता. त्यानंतर अर्शदीपलाही त्याने पायचित पकडलं. (Ind vs SL, 1st ODI)

अर्शदीपच्या (Arshdeep Singh) बाद होण्याच्या पद्धतीमुळे सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे. आधी गोलंदाजीवर त्याने ४७ धावांत २ बळी मिळवले होते. पण, फलंदाजीमुळे मात्र त्याच्यावर टीका होतेय. त्याची तुलना वेस्ट इंडिजच्या शॅनन ग्रॅब्रिएलशी होतेय. (Ind vs SL, 1st ODI)

 काहींनी अर्शदीपचं समर्थनही केलं आहे. ‘इतकं चिडू नका. हा तोच मुलगा आहे, ज्याने टी-२० विश्वचषकात भारतासाठी सगळ्यात जास्त बळी घेतले,’ असंही एका चाहत्याने लिहिलं आहे.  (Ind vs SL, 1st ODI)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.