Ind vs SL, 1st ODI Preview : पहिल्या एकदिवसीय सामन्यात सगळ्यांच्या नजरा पुनरागमन करणाऱ्या रोहित आणि विराटवर 

Ind vs SL, 1st ODI Preview : टी-२० विश्वचषकानंतर भारतीय संघ ही पहिली एकदिवसीय मालिका खेळणार आहे

131
Ind vs SL, 1st ODI Preview : पहिल्या एकदिवसीय सामन्यात सगळ्यांच्या नजरा पुनरागमन करणाऱ्या रोहित आणि विराटवर 
Ind vs SL, 1st ODI Preview : पहिल्या एकदिवसीय सामन्यात सगळ्यांच्या नजरा पुनरागमन करणाऱ्या रोहित आणि विराटवर 
  • ऋजुता लुकतुके

टी-२० विश्वचषक विजेतेपद आणि त्या मागोमाग आताची टी-२० मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ विजयरथावर आरुढ झालाय हे खरं आहे. पण, २ तारखेला श्रीलंकेविरुद्ध खेळण्यापूर्वी हे रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला तेच खरं आहे. ‘आता वेळ आली आहे टी-२० च्या अंमलातून बाहेर येण्याची. पुढील एकदिवसीय क्रिकेट कार्यक्रमावर लक्ष देण्याची आता गरज आहे,’ असं रोहित शर्मा म्हणाला. संघाची बांधणी आता चॅम्पियन्स करंडकासाठी होणार आहे. शिवाय आगामी कार्यक्रमही एकदिवसीय क्रिकेट आणि कसोटी क्रिकेटने भरलेला आहे. त्यामुळे रोहित म्हणतो ते बरोबरच आहे. (Ind vs SL, 1st ODI Preview)

(हेही वाचा- BMC : रस्ते आणि पदपथ धुण्यासाठी २७ कोटींच्या सात वाहनांची खरेदी; देखभालीसाठी ७५ कोटींचा खर्च)

भारतीय संघासमोर पहिलं आव्हान लंकन संघाचं आहे. घरच्या मैदानावर श्रीलंकेचा संघ कधीच दुबळा नव्हता. आताही तो आव्हान उभं करणार आहे. याउलट भारतीय संघात सगळ्यांच्या नजरा रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीवर (Virat Kohli) असतील. टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती पत्करल्यानंतर दोघांना एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करायचं आहे. एक महिन्याच्या सुटीनंतर ते पुन्हा क्रिकेट आणि स्पर्धा या गोष्टींशी कसं जुळवून घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. (Ind vs SL, 1st ODI Preview)

 रोहित (Rohit Sharma) परतल्यामुळे सलामीचा प्रश्न सुटला आहे. रोहित आणि यशस्वी सलामीला येणार हे नक्की आहे. तिसऱ्या क्रमांकावर शुभमनही पक्का आहे. तर विराट कोहलीचं (Virat Kohli) चौथं स्थान आहे. रोहित समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न असेल तो रिषभ पंत (Rishabh Pant) की के एल राहुल (KL Rahul), या दोघांपैकी कुणाला निवडायचं हा? (Ind vs SL, 1st ODI Preview)

(हेही वाचा- Love Jihad : पुण्यातील पतित पावन संघटनेची मागणी; जिहाद्यांच्या विरोधात कठोर कायदा झालाच पाहिजे)

के एल राहुलने (KL Rahul) अलीकडे भारतीय एकदिवसीय संघात चांगली कामगिरी केली आहे. अगदी एकदिवसीय विश्वचषकातही पाचव्या क्रमांकावर तो पक्का होता. पंत उपलब्ध नसताना राहुलने २३ सामन्यांत ७० च्या सरासरीने ८३४ धावा केल्या आहेत. त्याला निव्वळ फलंदाज म्हणून संघात घेऊन पंतला यष्टीरक्षण सोपवायचं. की, राहुल आणि श्रेयर अय्यर (Shreyas Iyer) या मधल्या फळीला खेळवायचं हा प्रश्न रोहितसमोर उभा असेल. या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे सध्या नाही, असं त्यानेच पत्रकारांसमोर उघड केलं आहे.  (Ind vs SL, 1st ODI Preview)

हार्दिक पांड्या (Hardik Pandya) या मालिकेसाठी उपलब्ध नाही. त्यामुळे अष्टपैलू म्हणून रियान पराग (Riyan Parag) किंवा शिवम दुबेचा (shivam Dube) विचार होऊ शकतो. त्यातही परागने अलीकडे टी-२० मालिकेत चांगली कामगिरी केल्यामुळे त्याचीच निवड पक्की दिसत आहे. (Ind vs SL, 1st ODI Preview)

(हेही वाचा- घरात बसणाऱ्यांनी मैदानात उतरण्याची भाषा करू नये! CM Eknath Shinde यांचा उद्धव ठाकरेंना टोला)

दुसरीकडे श्रीलंकन संघ हा नवीन आणि जुन्या खेळाडूंचं चांगलं मिश्रण असलेला संघ आहे. पण, आघाडीची फळी बाद झाली की, नवीन खेळाडू धावा करताना दिसत नाहीएत. ही चूक त्यांना लवकरात लवकर सुधारावी लागणार आहे. तर पथिराणा (Pathirana) आणि मधुशंका (Madushanka) हे मुख्य गोलंदाजही ही मालिका खेळणार नाहीएत. याचा फटका त्यांना बसणार आहे. भारतीय वेळनुसार शुक्रवारी दुपारी दीड वाजता हा सामना सुरू होईल. (Ind vs SL, 1st ODI Preview)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.