Ind vs SL, 1st T20 : पहिल्या टी-२० सामन्यापूर्वी रायन टेन ड्युसकाटे भारतीय ताफ्यात सामील

Ind vs SL, 1st T20 : गौतम गंभीरने लंका दौऱ्यावर सहाय्यक प्रशिक्षक म्हणून रायन टेनची निवड केली आहे 

146
Ind vs SL, 1st T20 : पहिल्या टी-२० सामन्यापूर्वी रायन टेन ड्युसकाटे भारतीय ताफ्यात सामील
Ind vs SL, 1st T20 : पहिल्या टी-२० सामन्यापूर्वी रायन टेन ड्युसकाटे भारतीय ताफ्यात सामील
  • ऋजुता लुकतुके

नेदरलँड्सचा माजी खेळाडू रायन टेन ड्युसकाटे भारतीय संघाबरोबरच्या सपोर्ट स्टाफच्या ताप्यात दाखल झाला आहे. श्रीलंका दौऱ्यात तो मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचा (Gautam Gambhir) सहाय्यक असणार आहे. गंभीर कोलकाता नाईट रायडर्स फ्रँचाईजीचा (Kolkata Knight Riders Franchise) मार्गदर्शक असताना ड्युसकाटे तिथे सहाय्यक प्रशिक्षक होता. भारतीय संघाचा फलंदाजीचा प्रशिक्षक म्हणूनही गंभीरने त्याच्याच नावाची शिफारस केली आहे. पण, बीसीसीआयने अजून कायमस्वरुपी परदेशी खेळाडूला परवानगी दिलेली नाही. (Ind vs SL, 1st T20)

(हेही वाचा- Ashadhi Ekadashi 2024 : वारीतून एसटीला फायदा किती? वाचा सविस्तर…)

पण, नवीन सपोर्ट स्टाफची नियुक्ती होईपर्यंत गंभीरच्या पसंतीच्या ड्युसकाटेला श्रीलंका दौऱ्यावर नेण्यासाठी मात्र बीसीसीआय राजी झालं. कोलकाता फ्रँचाईजीतील आणखी एक प्रशिक्षक अभिषेक नायरही भारतीय संघाबरोबर सध्या श्रीलंकेत आहे. (Ind vs SL, 1st T20)

 फक्त इतकंच नाही तर भारतीय संघाचा गोलंदाजीचा प्रशिक्षक म्हणूनही गंभीरने दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज मॉर्ने मॉ्केलचं (Morne Mockel) नाव सुचवलं आहे. मॉर्केलने गंभीरबरोबर लखनौ फ्रँचाईजीमध्ये एकत्र काम केलं आहे. टी दिलीप मात्र क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक म्हणून कायम राहणार आहेत. बीसीसीआयचीही गंभीरला तशीच सूचना होती. (Ind vs SL, 1st T20)

(हेही वाचा- Sanjay Pandey: Hindustan Post Exclusive, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे विधानसभा निवडणुक लढवणार!)

श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफची अधिकृत घोषणा होईल. श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघ ३ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे. टी-२० सामने २७, २८ आणि ३० जुलैला होणार आहेत. तर एकदिवसीय सामने २, ४ आणि ७ ऑगस्टला होतील. (Ind vs SL, 1st T20)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.