- ऋजुता लुकतुके
सूर्यकुमार यादव हा भारतीय संघातील एक मॅचविनर खेळाडू आहे. आतापर्यंत ही करामत त्याने बॅटने दाखवून दिली आहे. पण, श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या टी-२० सामन्यात शेवटच्या षटकात त्याने चेंडू हातात घेतला. तो ही लंकन संघाला विजयासाठी ६ चेंडूंत ६ धावा हव्या असताना आणि हातात ४ गडी शिल्लक असताना त्याने चेंडूने जादू केली. सूर्यकुमारचे गोलंदाजीतील बदलही बुधवारी कमालीचे प्रभावी ठरले. भारताला ९ बाद १३७ धावांवर रोखल्यानंतर श्रीलंकेची अवस्था १८ षटकांत ४ बाद १२९ अशी होती आणि १२ चेंडूंत त्यांना फक्त ९ धावा हव्या होत्या. अशावेळी मोहम्मद सिराज किंवा खलिल अहमदकडे चेंडू सोपवण्याऐवजी सूर्यकुमारने रिंकू सिंगला चेंडू दिला. (Ind vs SL, 3rd T20)
रिंकू हा काही नियमित फिरकीपटू नाही. पण, खेळपट्टीवर चेंडू धिम्या वेगाने येत होता. ते पाहून हा पहिला धोका सूर्यकुमारने पत्करला. रिंकूनेही त्याला निराश केलं नाही. त्याने फक्त ३ धावा देत दोन महत्त्वाचे बळी मिळवले. सामना त्यामुळे रंगतदार अवस्थेत पोहोचला. आता शेवटचं षटक निर्णायक होतं. इथं षटकांची गती न राखल्यामुळे भारताला फक्त चारच फलंदाज ३० यार्डांच्या वर्तुळाबाहेर ठेवता येणार होते. अशावेळी सूर्यकुमारने धिम्या गतीच्या चेंडूंनी कमाल करून दाखवली. (Ind vs SL, 3rd T20)
(हेही वाचा – मालवणीत Hindu युवतीला राहते घर सोडून जाण्यासाठी मुसलमानांकडून छळ)
Game-changing batting ✅
Game-changing bowling ✅@surya_14kumar bhau mann la 👏🙇♂️#SonySportsNetwork #SLvIND #TeamIndia #SuryakumarYadav pic.twitter.com/5G3PESMVY9— Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 30, 2024
पहिला चेंडू त्याने ताशी ८६ किमी वेगाने टाकला. मेंडिसने हा चेंडू रिव्हर्स स्विप केला. पण, थर्डमॅनला उभ्या असलेल्या रिंकू सिंगने झेल नीट पकडला. दुसऱ्याच चेंडूवर सूर्यकुमारने थिक्षणाला लेग साईडला संजू सॅमसनकडे झेल द्यायला लावला. आधी पंचांनी थिक्षणाला बाद दिलं नव्हतं. पण, भारताने डीआरएसचा सहारा घेतला. आणि चेंडू थिक्षणाच्या ग्लव्जना लागल्याचं स्पष्ट झालं. असिथा फर्नांडोने पुढच्या हॅट ट्रीक चेंडूवर एक धाव घेतली आणि विक्रमसिंघेनं पुढच्या दोन चेंडूंवर प्रत्येकी दोन धावा घेत सामना बरोबरीत आणला. सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. (Ind vs SL, 3rd T20)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community