भारत आणि श्रीलंका यांच्यातील आशिया कपच्या फायनल (IND Vs SL Final Asia Cup )सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेसाठी मोहम्मद सिराज चांगलाच भारी पडला. सिराजने घेतलेल्या ६ विकेट्सच्या जोरावर भारताने श्रीलंकेला केवळ १५ ओव्हर मध्ये ५० धावात गुंडाळले.
जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात लंकेला पहिला धक्का दिला तर सिराजने चौथ्या षटकात ४ विकट्स घेत श्रीलंकेची अवस्था ४ षटकात ५ बाद १२ धावा अशी केली होती. सिराजने श्रीलंकेचा कर्णधार दसुन शानकाची विकेट घेत पाचवी विकेट घेतली त्यानंतर १७ धावा करणाऱ्या कुसल मेंडीसला देखील बाद करत लंकेला सातवा आणि मोठा धक्का दिला. मेंडीसच्या रूपाने सिराजने सहावी विकेट घेतली.
(हेही वाचा : NIA Raids : एनआयए ISIS मॉड्यूलविरोधात आक्रमक; तामिळनाडूसह तेलंगणात 30 ठिकाणी छापे)
Join Our WhatsApp Community