Ind vs SL : गंभीरचा भरवसा संजू सॅमसनवर की रिषभ पंतवर?

Ind vs SL : गौतम गंभीरने आगामी मालिकांकडे लिटमस चाचणी म्हणून पाहत असल्याचं आधीच जाहीर केलं आहे 

121
Ind vs SL : गंभीरचा भरवसा संजू सॅमसनवर की रिषभ पंतवर?
Ind vs SL : गंभीरचा भरवसा संजू सॅमसनवर की रिषभ पंतवर?
  • ऋजुता लुकतुके

भारत आणि श्रीलंका (Ind vs SL) दरम्यानची टी-२० मालिका २७ जुलैपासून सुरू होत आहे. २७, १८ तसंच ३० जुलैला तीन टी-२० सामने पार पडणार आहेत. गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्या मुख्य प्रशिक्षक म्हणून कारकीर्दीची ही सुरुवात असेल. आपल्या पहिल्या टी-२० मालिकेत यष्टीरक्षणाची जबाबदारी तो रिषभ पंतवर (Rishabh Pant) सोपवतो की, संजू सॅमसनवर (Sanju Samson) याची सध्या चर्चा सुरू आहे. कारण, स्वत: गंभीर सराव सत्रादरम्यान सॅमसनबरोबर जोरदार सराव करताना दिसला.

दोघंही तडाखेबंद फलंदाज आहेत. रिषभला आघाडीच्या फळीत तो डावखुरा असल्याचा फायदा मिळतो. म्हणूनच टी-२० विश्वचषकात रिषभला संधी मिळाली. तर संजू सॅमससनला (Sanju Samson) एकही सामना खेळता आला नाही. फलंदाजीत दोघांचाही दृष्टिकोण सारखाच आहे. रिषभ पंत टी-२० विश्वचषकातील भारताचा तिसरा यशस्वी फलंदाज होता. त्याने ८ सामन्यांत १७१ धावा केल्या होत्या. (Ind vs SL)

(हेही वाचा- Kanwar Yatra Controversy: नेमप्लेटच्या वादावर योगी सरकारने SC मध्ये दाखल केले उत्तर, जाणून घ्या काय आहेत युक्तिवाद?)

याउलट संजू सॅमसनने पदार्पणाची आयपीएल गाजवल्यानंतर भारतीय संघात २०१६ मध्ये प्रवेश केला. पण, तेव्हापासून आतापर्यंत तो फक्त २७ आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. यात त्याने १३१ च्या स्ट्राईकरेटने धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर अवघं १ अर्धशतक आहे. तर पंतच्या नावावर ७४ टी-२० सामने आहेत. ४ अर्धशतकांसह त्याने १२७ चा स्ट्राईकरेट राखला आहे. संजू सॅसमनला आंतरराष्ट्रीय स्तरावर अजून म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही. पण, त्याच्यातील कौशल्य आणि फलंदाजीची तडफ लपून राहत नाही. त्यामुळे तो संघातील जागेसाठी एक प्रमुख दावेदार असतो. (Ind vs SL)

दीड वर्षांपूर्वी झालेल्या रस्ते अपघातानंतर दुखापतीतून सावरतानाही त्याने शिस्तबद्धता दाखवून दिली आहे. पुनरागमनाची आयपीएल स्पर्धा तसंच टी-२० विश्वचषकात त्याने आपली छाप पाडली आहे. (Ind vs SL)

(हेही वाचा- Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi: वारकऱ्यांचा ठिय्या! दिंड्या मागे ठेवून रथ निघाला पुढे)

गौतम गंभीर (Gautam Gambhir) समोरची जबाबदारी भारताला २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी तयार करण्याचीही आहे. मधल्या काळात रिषभ पंत (Rishabh Pant) नसताना भारताने संजू सॅमसनबरोबरच ध्रुव जुरेल आणि जितेन शर्मा यांच्यासारखे पर्यायही तपासून पाहिले आहेत. पण, अपघातापूर्वीच्या रिषभ पंतची जागा कुणी घेऊ शकलं नाही. त्यामुळेच रिषभ पंत उजवा ठरतो. आता गौतम गंभीर नेमकी काय भूमिका घेतो हे टी-२० मालिकेत कळेलच. (Ind vs SL)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.