Ind vs Sl : श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघ मुंबईत दाखल

133
Ind vs Sl : श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघ मुंबईत दाखल

ऋजुता लुकतुके

भारतीय संघाने (Ind vs Sl) आतापर्यंत या विश्वचषक स्पर्धेत डबल हॅट-ट्रीक म्हणजे सलग सहा विजय मिळवले आहेत. आणि १२ गुणांसह संघ अव्वल क्रमांकावर विराजमान आहे. आता विजयाची सापडलेली ही विलक्षण लय संघाला गुरुवार (२ नोव्हेंबर) श्रींलकेविरुद्धही गमावायची नाही.

२ नोव्हेंबरला, गुरुवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर (Ind vs Sl) भारत विरुद्ध श्रीलंका हा सामना रंगणार आहे. त्यासाठी भारतीय संघ सोमवारी लखनौहून मुंबईत दाखल झाला आहे. या स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत सगळ्यात जास्त प्रवास केला आहे. आधीच्या सहा सामन्यांसाठी संघाने चेन्नई, पुणे, अहमदाबाद, नवी दिल्ली, धरमशाला, लखनौ आणि आता मुंबई असा देशाच्या सगळ्या कोपऱ्यात प्रवास केला आहे.

(हेही वाचा – Maratha Reservation : वर्षा निवासस्थानी बैठकांचे सत्र सुरूच)

आताही रविवारचा दिवस-रात्र सामना खेळून दमलेला संघ मुंबईत संध्याकाळी दाखल झालाय.

भारतीय खेळाडू संघाच्या बसमध्ये बसण्यापूर्वी सलामीवीर (Ind vs Sl) शुभमन गिल आणि ईशान किशन एकमेकांशी गप्पा मारत होते. मुंबईतही संघाच्या स्वागतासाठी चाहत्यांनी जोरदार गर्दी केली होती. जायबंदी हार्दिक पांड्या दुखापतीमुळे आधी न्यूझीलंड आणि मग इंग्लंड विरुद्धचा सामना खेळू शकला नव्हता.

उपचारांसाठी तो बंगळुरूच्या (Ind vs Sl) राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल झाला होता. पण, तो ही मुंबईत भारतीय संघात सामील होणार आहे. अर्थात, श्रीलंकेविरुद्ध तो खेळण्याची शक्यता कमीच आहे. त्याच्या अनुपस्थितीत सुर्यकुमार यादव आणि महम्मद शामी यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.

बुधवारी भारतीय संघासाठी (Ind vs Sl) वानखेडे स्टेडिअमवर वैकल्पिक नेट्स आयोजित करण्यात आले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.