-
ऋजुता लुकतुके
कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडिअमवर सध्या भारतीय संघ श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेची तयारी करत आहे. तिथे एक दृश्य सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होतं. ते म्हणजे विराट कोहली (Virat Kohli) आणी गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यातील सुसंवाद. दोन वर्षांमागे आयपीएलमध्ये दोघांमध्ये रंगलेली खडाजंगी आता मागे पडलीय, असं स्पष्टपणे जाणवत होतं. भारतीय संघाला विजय मिळवून देण्याच्या समान उद्देशाने आता हे दोघं दोन वेगवेगळ्या भूमिकांमध्ये एकत्र आलेले दिसत आहेत. (Ind vs SL, ODI Series)
(हेही वाचा- Anshuman Gaikwad No More : कर्करोगाशी झुंजत असलेले माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचं निधन )
नेट्समध्ये विराट आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) एकमेकांशी भरपूर चर्चा करताना दिसले. त्यांच्यामध्ये हास्य विनोदही रंगले होते. त्यामुळे सध्या या दोघांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत. फक्त विराट खेळत असलेली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ही फ्रँचाईजीच नाही तर आयसीसीनेही या दोघांचा फोटो शेअर केला आहे. (Ind vs SL, ODI Series)
Our seasoned right-arm quick convincing the gaffer to give him the new ball. 😉#PlayBold #SLvIND pic.twitter.com/4zETCQBJ5D
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) July 31, 2024
‘हे दृश्य विसरता येण्यासारखं नाही,’ असं म्हणत राजस्थान रॉयल्सनेही एक फोटो ट्विट केला आहे. तर आयसीसीने गौतम गंभीर इतका हसून कुणाला दाद देतो आहे? असा मथळा फोटोला दिला आहे. (Ind vs SL, ODI Series)
Can’t unsee it… 😂 pic.twitter.com/bXtUZZdrQ7
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) July 31, 2024
View this post on Instagram
टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर विराट कोहलीबरोबरच (Virat Kohli) रोहित शर्मानेही (Rohit Sharma) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सुटी घेतली होती. एक महिना कुटुंबीयांबरोबर घालवल्यानंतर दोघं एकदिवसीय संघात सहभागी झाले आहेत. दोघंही मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरबरोबर पहिल्यांदा काम करत आहेत. पुढील वर्षी होणारा चॅम्पियन्स करंडक आणि कसोटी अजिंक्यपद स्पर्धा यावर आता भारतीय संघाने लक्ष केंद्रीत केलं आहे. (Ind vs SL, ODI Series)
(हेही वाचा- Paris Olympic 2024 : बॅडमिंटनच्या पहिल्या बाद फेरीत अखेर लक्ष्य सेन वि. एच एस प्रणॉय)
श्रीलंकेविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना २ ऑगस्टला होणार आहे. तर दुसरा ४ आणि तिसरा ७ तारखेला होणार आहे. (Ind vs SL, ODI Series)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community