Ind vs SL, ODI Series : विराट, रोहितने चाहत्याला स्वाक्षरी देऊन केलं खुश

Ind vs SL, ODI Series : भारत विरुद्ध श्रीलंका एकदिवसीय मालिका २ ऑगस्टपासून सुरू होतेय. 

147
Ind vs SL, ODI Series : विराट, रोहितने चाहत्याला स्वाक्षरी देऊन केलं खुश
  • ऋजुता लुकतुके

भारताचे स्टार खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा हे जागतिक स्तरावर चाहतावर्ग असलेले भारतीय फलंदाज आहेत. त्यामुळे भारताचा एकदिवसीय संघ श्रीलेकेत पोहोचला तेव्हा सगळ्याचं लक्ष विराट आणि रोहितवरच होतं. सध्या हा संघ कोलंबोत प्रेमदासा मैदानावर सराव करत आहे. दोघांनी टी-२० विश्वचषकानंतर एका महिन्याची सुट्टी घेतली होती. त्यामुळे या मालिकेच्या सरावावर दोघांचं काटेकोर लक्ष आहे. (Ind vs SL, ODI Series)

पण, सराव संपल्यानंतर या दोन्ही खेळाडूंनी काही वेळ त्यांच्या चाहत्यांबरोबर घालवला. कोहली नेट्समधून बाहेर पडला तेव्हा काही लहान मुलं त्याची वाट पाहत होती. यातल्या एका छोट्या क्रिकेटवीराच्या हातात विराट आणि रोहितचा एकत्र फोटो होता. हा फोटो होता अलीकडेच भारतीय संघाने टी-२० विश्वचषक विजेतेपद पटकावलं, त्यानंतरचा. (Ind vs SL, ODI Series)

(हेही वाचा – Missed 31st July Deadline : आयकर विवरणपत्र भरण्याची ३१ जुलैची तारीख हुकली तर काय कराल?)

कोहलीने या छोट्या मुलाला पाहिल्यावर तो त्याच्याकडे चालत गेला. त्याने त्या फोटोवर स्वाक्षरी केली. त्या छोट्या चाहत्याशी त्याने काही क्षण गप्पाही मारल्या. त्या लहान मुलासाठी हा आनंद इथेच संपला नाही. हे सगळं जवळूनच पाहत असलेला रोहित शर्माही लेगच तिथे आला आणि त्यानेही या मुलाशी गप्पा मारायला सुरुवात केली. (Ind vs SL, ODI Series)

विराट आणि रोहितचं छोट्या चाहत्याशी हे वागणं सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालं आहे. त्याला आतापर्यंत एक लाखांहून जास्त व्हूज मिळाले आहेत. २ ऑगस्टपासून भारत आणि श्रीलंका दरम्यान एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. आधी रोहित आणि विराट या मालिकेत खेळणार नाहीत अशी चर्चा होती. पण, गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यावर चॅम्पियन्स करंडकाच्या तयारीच्या दृष्टीने त्याने या दोघांना खेळण्याची विनंती केल्याचं समजतंय. टी-२० विश्वचषकानंतर दोघंही पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय मालिकेत खेळणार आहेत. (Ind vs SL, ODI Series)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.