-
ऋजुता लुकतुके
गतविजेत्या भारतीय संघाने यंदाच्या आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत अपेक्षेप्रमाणेच आरामात प्रवेश केला आहे. उपान्त्य लढतीत त्यांनी दक्षिण कोरियाचा ४-१ ने दिमाखात पराभव केला. पुन्हा एकदा हरमनप्रीत सिंग विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने पेनल्टी कॉर्नरवर दोन गोल करत विजयात मोठा वाटा उचलला. उत्तम सिंगने तेराव्या मिनिटाला गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. तर हरमनप्रीतने १९ आणि ४५ व्या मिनिटाला गोल करत आघाडी वाढवली. आणि जरमनप्रीतने ३२ व्या मिनिटाला गोल केला. (Ind vs South Korea, Hockey)
(हेही वाचा- मद्यपी चालकाची Chandrakant Patil यांच्या वाहनाला धडक)
कोरियाचा एकमेव गोल यांग जिहूनने ३३ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर केला. या स्पर्धेत भारतीय संघ आतापर्यंत अपराजित आहे. शेवटच्या साखळी सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानलाही त्यांनी २-१ ने हरवलं होतं. (Ind vs South Korea, Hockey)
https://twitter.com/TheHockeyIndia/status/1835651723379306755
आता अंतिम फेरीत भारताचा मुकाबला मंगळवारी चीनशी होणार आहे. चीनने दुसऱ्या उपान्त्य लढतीत पाकिस्तानला धक्का दिला. १-१ अशा बरोबरीनंतर झालेल्या पेनल्टी शूटआऊटनंतर २-० ने हरवलं. पाकिस्तान आणि कोरियाचा मुकाबला तिसऱ्या क्रमांकासाठी होईल. कोरिया विरुद्धच्या सामन्यात भारताने सुरुवातच आक्रमक केली. आणि कोरियन बचाव फळीसमोर सतत आव्हान उभं केलं. अगदी चौथ्याच मिनिटाला अभिषेकने गोलचा चांगला प्रयत्न केला होता. गोली किम जेहानने हा गोल थोडक्यात वाचवला. (Ind vs South Korea, Hockey)
(हेही वाचा- Mumbai Ganesh Visarjan 2024 : रात्री 11 वाजता समुद्राला मोठी भरती; सार्वजनिक गणपतींचे विसर्जन लवकर होण्याची शक्यता)
चेंडूचा ताबा पहिल्यापासून भारताकडेच होता. अखेर पहिल्या गोलची वेळ तेराव्या मिनिटाला आली. उत्तम सिंगने अरिजीत सिंगच्या पासवर गोल केला. हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरवरील आपली हातोटी कायम ठेवली. आणि लागोपाठ दोन गोल केले. जरमनप्रीत संपूर्ण सामन्यात आघाडीवर राहून चांगली कामगिरी करत होता. अखेर त्यालाही गोलची संधी मिळाली. आणि त्याने चौथा गोल केला. (Ind vs South Korea, Hockey)
Hero of the match
SINGH JarmanpreetShirt #04
Country India
Hero Asian Champions Trophy Moqi China 2024#hact2024#asiahockey pic.twitter.com/rtaw7Uwvlg— Asian Hockey Federation (@asia_hockey) September 16, 2024
पी आर श्रीजेशच्या निवृत्तीनंतर सूरज करकेराने सामन्यात गोल जाळ्याचं संरक्षण केलं. आणि या सामन्यात काही चांगले फटके त्याने परतून लावले. सामन्यातील शेवटच्या दहा मिनिटांत त्याने भक्कम बचावाचं प्रात्यक्षिक दाखवलं. आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारताने पाचव्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. (Ind vs South Korea, Hockey)