IND vs WI T20 : वेस्ट इंडिजकडून भारतीय संघाचा पराभव

पुढील सामना आता ६ ऑगस्ट रोजी गयाना येथील प्रॉव्हिडन्स स्टेडियमवर होणार

197
IND vs WI T20 : वेस्ट इंडिजकडून भारतीय संघाचा पराभव
IND vs WI T20 : वेस्ट इंडिजकडून भारतीय संघाचा पराभव

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला टी-२० सामन्यात गुरुवारी (३ ऑगस्ट) १५० धावांचे लक्ष गाठण्यात अपयश आले. ५ सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ १-० ने पिछाडीवर गेला. वेस्ट इंडिज संघाने भारतीय संघाला ४ धावांनी पराभूत केले. या मालिकेतील पुढील सामना आता ६ ऑगस्ट रोजी गयाना येथील प्रॉव्हिडन्स स्टेडियमवर होणार आहे.

पोर्ट ऑफ स्पेन येथे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना विंडीजने २० षटकांत ६ गडी गमावून १४९ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाला ८ विकेट्सवर केवळ १४५ धावाच करता आल्या.

यामुळे झाला भारताचा पराभव

खराब क्षेत्ररक्षण

खराब क्षेत्ररक्षण हे भारताच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण होते. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी झेल सोडले. १४ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर शुभमन गिलने पहिला झेल सोडला. तर पुढच्याच षटकात युझवेंद्र चहलने कर्णधार रोव्हमन पॉवेलचा झेल सोडला.

(हेही वाचा – Jaipur Express Firing : ‘त्या’ घटनेनंतर आता ट्रेनमध्ये एस्कॉर्ट करणाऱ्या जवानांना स्वयंचलित गन देण्यास मनाई)

सलामीवीर अपयशी

एकदिवसीय मालिकेत धडाका लावणारी शुभमन गिल आणि ईशान किशन ही सलामीची जोडी पार अपयशी ठरली. गिलने ९ चेंडूत ३ धावा आणि किशनने ९ चेंडूत केवळ ६ धावा केल्या.

लागोपाठ गमावल्या विकेट

भारतीय फलंदाज विंडीजविरुद्ध मोठी भागीदारी रचण्यात अपयशी ठरला. संघ एकापाठोपाठ एक विकेट्स गमावत राहिला. सामन्यातील सर्वात मोठी भागीदारी सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्यात झाली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ३९ धावा जोडल्या.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.