IND vs ZIM 1st T20 Match: टीम इंडियाची ‘यंग ब्रिगेड’ झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात ठरली अपयशी!

138
IND vs ZIM 1st T20 Match: टीम इंडियाची ‘यंग ब्रिगेड’ झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात ठरली अपयशी!
IND vs ZIM 1st T20 Match: टीम इंडियाची ‘यंग ब्रिगेड’ झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात ठरली अपयशी!

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना (IND vs ZIM 1st T20 Match) हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळला गेला. या सामन्यात झिम्बाब्वे संघाने टी-२० विश्वचषक विजेत्या टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडचा १३ धावांनी पराभव केला. या सामन्यातील पराभवामुळे टीम इंडिया या मालिकेत ०-१ ने पिछाडीवर पडली आहे. २०२४ मधील टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाचा हा पहिला पराभव होता.

झिम्बाब्वेविरुद्ध ८ वर्षानंतर पराभव

यापूर्वी भारताने सर्व मालिका आणि विश्वचषकातील सामने जिंकले होते. आता झिम्बाब्वेने भारताची सलग १२ सामन्यांची विजयी मालिका खंडीत केली आहे. तसेच भारताला झिम्बाब्वेविरुद्ध ८ वर्षानंतर पराभव पत्करावा लागला आहे. याआधी २०१६ साली भारतीय संघ पराभूत झाला होता. दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने (Shubman Gill) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर झिम्बाब्वेने पहिल्या डावात फलंदाजी करताना २० षटकांत ९ गडी गमावून ११४ धावा केल्या. (IND vs ZIM 1st T20 Match)

कर्णधार गिल सर्वाधिक धावा करणारा फलंदाज

सामन्याच्या दुसऱ्या डावात टीम इंडियासमोर विजयासाठी केवळ ११६ धावांचे लक्ष्य होते. जे भारतीय संघ अगदी सहज साध्य करण्याच्या इराद्याने मैदानात उतरले होते. मात्र, भारतीय संघाला हे लक्ष्य गाठता आले नाही आणि १९.५ षटकात १०२ धावांवर सर्वबाद झाला. या काळात कर्णधार गिल सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने २९ चेंडूत ३१ धावा केल्या. याशिवाय वॉशिंग्टन सुंदरने २७ आणि आवेश खानने १२ चेंडूत १६ धावा केल्या. तरीही टीम इंडियाने शेवटच्या षटकात सामना गमावला. (IND vs ZIM 1st T20 Match)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.