Ind vs Zim 5th T20 : पाचवा टी-२० सामना जिंकून भारताने मालिकाही ४-१ ने जिंकली 

Ind vs Zim 5th T20 : पाचव्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात भारताने झिंबाब्वेचा ४२ धावांनी पराभव केला 

120
Ind vs Zim 5th T20 : पाचवा टी-२० सामना जिंकून भारताने मालिकाही ४-१ ने जिंकली 
Ind vs Zim 5th T20 : पाचवा टी-२० सामना जिंकून भारताने मालिकाही ४-१ ने जिंकली 
  • ऋजुता लुकतुके 

भारताच्या झिम्बाब्वे (Ind vs Zim 5th T20) दौऱ्याची सुरुवात आठवत असेल तर भारतीय संघाचा पहिल्या टी-२० सामन्यात १३ धावांनी पराभव झाला होता. टी-२० विश्वचषक विजेता भारतीय संघ विजेतेपदानंतरच्या पहिल्याच सामन्यात ढेपाळला म्हणून खेळाडूंचं हसंही झालं. पण, संघातील प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली नवीन संघ झिम्बाब्वेला गेला होता. तिथल्या दुहेरी वेग असलेल्या खेळपट्टीचा अंदाज भारतीय खेळाडूंना जरा उशिराच आला. पहिला सामना भारताने गमावला. पण, त्यानंतर मात्र पुढचे चार सामना निर्विवाद वर्चस्व राखत भारताने जिंकले आहेत. पाचव्या सामन्यातही भारताने १६२ धावांचं संरक्षण करत हा सामना ४२ धावांनी जिंकून मालिकाही ४-१ ने खिशात घातली आहे. (Ind vs Zim 5th T20)

(हेही वाचा- पुरोगामी चळवळींना लक्ष्य करण्याचा उद्देश; महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्यावर Jayant Patil यांची टीका)

संजू सॅमसन (Sanju Samson), यशस्वी जायसवाल (Yashasvi Jaiswal), शुभमन गिल (Shubman Gill) आणि अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) या टी-२० विश्वचषकात संधी न मिळालेल्या खेळाडूंनी गाजवलेली मालिका म्हणून ही मालिका लक्षात राहील. तर गोलंदाजांमध्ये मुकेश कुमार (Mukesh Kumar), आवेश खान (Avesh Khan) आणि रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) यांनी आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. शिवम दुबे (Shivam Dube) अष्टपैलू म्हणून भारतीय संघात आला. पण, विश्वचषकात त्याला गोलंदाजीची संधी मिळाली नव्हती. पाचव्या टी-२० सामन्यात अष्टपैलू कामगिरी करत त्याने सामनावीर पुरस्कार पटकावला. आणि दुसऱ्या फळीनेही वर्चस्व राखत ही मालिका जिंकली. पाचव्या टी-२० सामन्यात भारताने पहिली फलंदाजी करत ६ बाद १६७ धावा केल्या. झिम्बाब्वेचा डाव त्यांनी १२५ धावांत गुंडाळला. (Ind vs Zim 5th T20)

यशस्वी, शुभमन आणि अभिषेक या पहिल्या तीन फलंदाजांची बॅट एरवी या मालिकेत चालली होती. पण, रविवारी तिघेही मोठी धावसंख्या करू शकले नाहीत. पण, फलंदाजीची ती संधी यावेळी संजू सॅमसनने (Sanju Samson) साधली. त्याने ४५ चेंडूंत ५८ धावा करताना ४ षटकार खेचले. रियान परागने २२ आणि शिवम दुबेनं २६ धावा करत त्याला चांगली साथ दिली. आणि त्याच्या जोरावर भारतीय संघाने १६० धावांचा टप्पा ओलांडला. (Ind vs Zim 5th T20)

(हेही वाचा- Hyundai Tucson 2024 : हुंडई टक्सनचा नवीन अवतार आला लोकांसमोर, इंटेरिअरमध्ये मोठा बदल )

याला उत्तर देताना झिम्बाब्वेचा संघ चाचपडत खेळताना दिसला. डावात एकही मोठी भागिदारी होऊ शकली नाही. सलामीवीर मारुमानीच्या (Marumani) २७, डियॉन मायर्सच्या (Dion Myers) ३४ आणि फरझ अक्रमच्या (Faraz Akram) २७ धावांमुळे त्यांनी निदान १२५ धावांचा टप्पा तरी गाठला. नाहीतर संघ विजयाच्या मार्गावर कधीच नव्हता. मुकेश कुमारने २३ धावांत ३ बळी मिळवले. तर शिवम दुबेनं २५ धावांत २ बळी टिपले. (Ind vs Zim 5th T20)

शिवम दुबेला (Shivam Dube) सामनावीर तर वॉशिंग्टन सुंदरला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला. (Ind vs Zim 5th T20)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.