Ind vs Zim, T20 : झिम्बाब्वेचा २३ धावांनी पराभव करत भारतीय संघाची मालिकेत २-१ ने आघाडी

Ind vs Zim, T20 : तिसऱ्या टी-२० सामन्यात कर्णधार शुभमन गिललाही सूर गवसला 

136
India’s Tour of Sri Lanka : भारताचा टी-२० संघ श्रीलंका दौऱ्यावर रवाना; गंभीर म्हणतो, राहुल द्रविडची जागा घेणं कठीण
  • ऋजुता लुकतुके 

झिंबाब्वे दौऱ्यात भारताच्या दुसऱ्या फळीतील संघाने टी-२० (Ind vs Zim, T20) मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. तिसरा सामना भारताने २३ धावांनी जिंकला. हरारे स्पोर्ट्स क्लबचं मैदान मात्र फलंदाजांसाठी आव्हानात्मक ठरलं. नाणेफेक जिंकून भारतीय संघाने पहिली फलंदाजी घेतली आणि ४ बाद १८२ धावा केल्या. त्याला झिंबाब्वेनं ६ बाद १५९ असं उत्तर दिलं. खेळपट्टीवर काही चेंडू खाली राहत होते. टप्पा अचूक पकडला नाही तर चेंडूला फटकावणंही कठीण जात होतं.  (Ind vs Zim, T20)

(हेही वाचा- Telangana पोलिसांकडून Nashik मध्ये गांजातस्करी प्रकरणी महिला नेत्याला अटक)

अशा खेळपट्टीवर भारतीय कर्णधार शुभमन गिलला (Shubman Gill) मात्र सूर गवसला. त्याने ४९ चेंडूंत ६६ धावा करताना संघाला पहिल्या ५ षटकांतच ५० चा टप्पा पार करून दिला. या सुरुवातीमुळेच भारतीय संघ पुढे १८० तरी करू शकला. यशस्वी जायसवालने (Yashasvi Jaiswal) मालिकेतील पहिला सामना खेळताना ३६ धावा केल्या. दोघांनी नवव्या षटकांत ६१ धावांनी सलामी भारताला करून दिली. त्यानंतर ऋतुराज गायकवाडनेही (Ruturaj Gaikwad) २९ चेंडूंत ४९ धावा केल्या. बाकी फलंदाज मात्र खेळपट्टीचा नूर पाहता थोडेसे अडखळले. अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) १० धावांवर बाद झाला.  (Ind vs Zim, T20)

भारतीय फलंदाजांनी जशी डावाला चांगली सुरुवात करून दिली तीच भूमिका गोलंदाजांनीही सुरुवातीला पार पाडली. झिंबाब्वेचे वेस्ली (wesley) (१), मारुमानी (Marumani) (१३) आणि बेनेट (Bennett) (४) हे पहिले तीन फलंदाज १९ धावांत तंबूत परतले. तिथेच झिंबाब्वेचा पराभव जवळ जवळ स्पष्ट झाला. डियॉन मायर्सने (Dion Myers) ६६ धावा करत विजयाचा निकराचा प्रयत्न केला. तर सातव्या क्रमांकावर आलेल्या क्लाईव्हने ३७ धावा करत मायर्सला साथही दिली. पण, इतर फलंदाज खेळपट्टीवर उभे राहू शकले नाहीत. त्यामुळे झिंबाब्वे विजयाच्या जवळ जाऊ शकला नाही. (Ind vs Zim, T20)

(हेही वाचा- Nashik Accident : वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाणाऱ्या दोन मुली, जावयावर काळाचा घाला; मालेगावातील हृदयद्रावक घटना)

मायर्सच्या अर्धशतकामुळे त्यांनी निदान दीडशेचा टप्पा ओलांडला. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने (Washington Sundar) १५ धावांत ३ बळी मिळवले. त्यालाच सामनावीराचा पुरस्कार मिळाला. शुभमन गिलला (Shubman Gill) या सामन्यात चांगला सूर गवसला. आणि संघाच्या कामगिरीवर हा नवनियुक्त कर्णधार खुशही होता. ‘या मालिकेत अकराच्या अकरा खेळाडूंनी विजयात आपला वाटा उचलला. भारतीय डाव सुरू असतानाच खेळपट्टीचं स्वरुप लक्षात आलं. त्यामुळे गोलंदाजांना मदत मिळेल, असा अंदाज होताच. त्याप्रमाणे त्यांनी कामगिरीही चांगली केली,’ असं विजयानंतर शुभमनने बोलून दाखवलं. (Ind vs Zim, T20)

मालिकेतील चौथा टी-२० सामना शनिवारी १३ जुलैला होणार आहे. (Ind vs Zim, T20)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.